अलंकार व त्याचे प्रकार
Alankar v Tyache Prakar in Marathi
Alankar in Marathi | Marathi Alankar
अलंकार व त्याचे प्रकार ( Alankar v Tyache Prakar in Marathi | Alankar in Marathi | Marathi Alankar ) या विषयी आपण येथे माहिती पहाणार आहोत.
अलंकार ( Alankar ) हा शब्द कानावर पडताच आपल्या समोर येतात ते दागिने परंतु अलंकार ( Alankar ) या शब्दाचा अर्थ कोणत्याही गोष्टीची सौंदय वाढवण्यासाठी केलेली कृती होय. स्रिया जशा आपले सौंदर्य वाढवण्यासाठी दागिन्यांचा वापर करतात तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्द वापरतात. भाषा हे मानवी विचाराचे आदान-प्रदान करणारे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या भाषा ऐकण्यास मिळतात.
अलंकार म्हणजे काय?
कोणत्याही गोष्टीची सौंदय वाढवण्यासाठी केलेली कृती म्हणजे अलंकार (Alankar) होय.
भाषेचे अलंकार म्हणजे काय?
कोणत्या भाषेचे सोंदर्य वाढविण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला ‘भाषेचे अलंकार’ ( Bhasheche Alankar ) असे म्हणतात.
भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत.
अ क्र भाषेच्या अलंकाराचे प्रकार १ शब्दालंकार [ Shabdalankar ] २ अर्थालंकार [ Arthalankar ]
अ क्र | भाषेच्या अलंकाराचे प्रकार |
---|---|
१ | शब्दालंकार [ Shabdalankar ] |
२ | अर्थालंकार [ Arthalankar ] |
शब्दालंकार म्हणजे काय?
जेव्हा वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दातील अक्षररचनेमुळे भाषेच्या ओळी वाचताना नाद निर्माण होऊन भाषेला सोंदर्य प्राप्त होते, त्यास 'शब्दालंकार' ( Shabdalankar ) असे म्हणतात.
शब्दालंकाराचे तीन उपप्रकार आहेत.
अ क्र शब्दालंकाराचे उपप्रकार अ अनुप्रास अलंकार ( Anupras Alankar ) ब यमक शब्दालंकार ( Yamak Alankar ) क श्लेष शब्दालंकार ( Shlesh Alankar )
अ क्र | शब्दालंकाराचे उपप्रकार |
---|---|
अ | अनुप्रास अलंकार ( Anupras Alankar ) |
ब | यमक शब्दालंकार ( Yamak Alankar ) |
क | श्लेष शब्दालंकार ( Shlesh Alankar ) |
अ) अनुप्रास अलंकार म्हणजे काय?
वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या वर्णाच्या पुनरावृत्तीमुळे नादमाधुर्य निर्माण होऊन त्या वाक्य किंवा चरणाला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास 'अनुप्रास अलंकार’ ( Anupras Alankar ) असे म्हणतात.
अनुप्रास अलंकार उदाहरणे :-
१] बालिश बहु बायकांत बडबडला.२] पेटविले पाषाण पठरावरती शिवबांनी।
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संताची वाणी ||
३] देवी दीनदयाळा ! दूर दृत दास,
दुःख दूर दवडी शांतिच मज दे..
४] आज गोकुळात रंग खेळतो हरी।
राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी।।
वरील ओळीत ‘ब’, ‘प’, ‘ग’, ‘द’, ‘ज’ या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे नादसौंदर्य प्राप्त झाले आहे.
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी।।
वरील ओळीत ‘ब’, ‘प’, ‘ग’, ‘द’, ‘ज’ या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे नादसौंदर्य प्राप्त झाले आहे.
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
ब) यमक अलंकार म्हणजे काय?
कवितेमध्ये काही शब्दांचे वेगवेगळे अर्थ असून पण त्यांचा उच्चार असतो व अशा शब्दांचा उपयोग ठराविक ठिकाणी केल्याने त्यांच्या नाद निर्मितीने कवितेस जे सौंदर्य प्राप्त होते त्याला ‘यमक अलंकार’ ( Yamak Alankar ) असे म्हणतात.
यमक अलंकार उदाहरणे :-
१] मना सज्जना भक्तिपंथेसी जावे ।तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ||
२] सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पड़ो ।
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ||
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो ||
वरील ओळीत जावे - स्वभावे, घडो – पडो – झडो- नावडो या शब्दांच्या नादसौंदर्यमुले कवितेस जे सौंदर्य प्राप्त झाले.
क) श्लेष अलंकार म्हणजे काय?
वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकच शब्द जेव्हा दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे कवितेस किवा वाक्यास जे सौंदर्य प्राप्त होते त्याला ‘श्लेष अलंकार’ ( Shlesh Alankar ) असे म्हणतात.
श्लेष अलंकार उदाहरणे :-
१] मला विमान लागते.[ लागते = गरज असणे / त्रास होणे ]
२] श्रीकृष्ण नवरा मी नवरी। शिशुपाल नवरा मी न-वरी ॥
[ नवरी = पत्नी / लग्न न करणे ]
३] मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही.
[ मित्र = सखा / सूर्य ]
[ मित्र = सखा / सूर्य ]
४] ‘हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.’
[ जीवन = आयुष / पाणी ]
[ जीवन = आयुष / पाणी ]
५] शंकरास पूजिले सुमनाने
[ सुमनाने = चांगल्या मनाने / फुलांनी ]
[ सुमनाने = चांगल्या मनाने / फुलांनी ]
अर्थालंकार म्हणजे काय?
जेव्हा कवितेच्या चरणात किंवा वाक्यात वापरण्यात येणाऱ्या शब्दांमुळे त्या कवितेच्या चरणाच्या किवा वाक्याच्या अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते, तेव्हा त्यास 'अर्थालंकार' ( Arthalankar ) असे म्हणतात.
विशेषण – उपमान ( ज्याची उपमा द्यायची ती वस्तू )विशेष्य- उपमेय ( मूळ वस्तू किवा ज्याला उपमा द्यायची ती वस्तू )
अर्थालंकाराचे पुढील उपप्रकार आहेत.
अर्थालंकाराचे उपप्रकार
अ क्र अर्थालंकाराचे उपप्रकार १ उपमा अलंकार २ उत्प्रेक्षा अलंकार ३ अपन्हुती अलंकार ४ अनन्वय अलंकार ५ रूपक अलंकार ६ अतिशयोक्ती अलंकार ७ दृष्टांत अलंकार ८
विरोधाभास अलंकार
९ चेतनगुणोक्ती अलंकार १० अर्थांतरन्यास अलंकार ११ स्वभावोक्ती अलंकार १२ व्याजस्तुती अलंकार १३ पर्यायोक्ती अलंकार १४ सार अलंकार १५ अन्योक्ती अलंकार १६ ससंदेह अलंकार १७ भ्रान्तिमान अलंकार १८ व्यतिरेक अलंकार १९ असंगती अलंकार २० व्याजोक्ती अलंकार
अ क्र | अर्थालंकाराचे उपप्रकार |
---|---|
१ | उपमा अलंकार |
२ | उत्प्रेक्षा अलंकार |
३ | अपन्हुती अलंकार |
४ | अनन्वय अलंकार |
५ | रूपक अलंकार |
६ | अतिशयोक्ती अलंकार |
७ | दृष्टांत अलंकार |
८ | विरोधाभास अलंकार |
९ | चेतनगुणोक्ती अलंकार |
१० | अर्थांतरन्यास अलंकार |
११ | स्वभावोक्ती अलंकार |
१२ | व्याजस्तुती अलंकार |
१३ | पर्यायोक्ती अलंकार |
१४ | सार अलंकार |
१५ | अन्योक्ती अलंकार |
१६ | ससंदेह अलंकार |
१७ | भ्रान्तिमान अलंकार |
१८ | व्यतिरेक अलंकार |
१९ | असंगती अलंकार |
२० | व्याजोक्ती अलंकार |
अर्थालंकाराचे पुढील उपप्रकार आहेत.
१] उपमा अलंकार म्हणजे काय?
जेव्हा दोन वस्तूंमधील समानता दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस इत्यादी समानता दर्शवणारे शब्द वापरले जाते तेव्हा ‘उपमा अलंकार’ ( Upama Alankar ) होतो.
उपमा अलंकार उदाहरणे :-
१] सावळाग रंग तुझा पावसाळी नभापरी ।२] मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी.
३] असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी..
४] तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
२] उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे, असे दर्शविण्यासाठी भासे, की, जणू, जणूकाय, वाटे, गमे यांसारखे शब्द वापरले जातात तेव्हा ‘उत्प्रेक्षा अलंकार’ ( Utpreksha Alankar ) होतो.
उत्प्रेक्षा अलंकार उदाहरणे :-
२] हा आंबा जणू साखरच !
३] आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण !
४] ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
५] किल्लारी भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडव होते.
६] जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या |
७] साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या |
१] हे हृदय नसे, परि स्थंडील धगधगते ।
३] अपन्हुती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते तेव्हा ‘अपन्हुती अलंकार’ ( Apanhuti Alankar ) होतो. अपन्हुती म्हणजे लपविणे होय.
अपन्हुती अलंकार उदाहरणे :-
२] ओठ कशाचे? देठचि फुलले पारिजातकाचे ।
३] हा आंबा नाही, ही साखरच आहे.
४] न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील ।
न हे वदन, चंद्रमा शरदीचा गमे केवळ ||
हे पण पहा :- सिद्ध शब्द
हे पण पहा :- सिद्ध शब्द
४] अनन्वय अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबराबरच केली जाते तेव्हा 'अनन्वय अलंकार' ( Ananvay Alankar ) होतो.थोडक्यात एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे होय.
अनन्वय अलंकार उदाहरणे :-
१] झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा ।२] शकुंतलेसारखी सौंदर्यवती तीच ।
३] आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्यापरी ।
४] झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हाच ।
५] रूपक अलंकार म्हणजे काय?
उपमान आणि उपमेय वेगवेगळे नसून त्यांच्यामध्ये एकरूपता दाखविली जाते, तेव्हा 'रूपक अलंकार’ ( Rupak Alankar ) होतो.
रूपक अलंकार उदाहरणे :-
१] देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर२] वाघिणीचे दूध प्याले, वाघबच्चे फाकडे |
३] तिचा मुखचंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला.
४] कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा.
५] लहान मूल म्हणजे मातीचा गोळा ।
आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
६] तू माय, लेकरू मी तू गाय, वासरू मी।
हे पण पहा :- रस व त्याचे प्रकार
हे पण पहा :- रस व त्याचे प्रकार
६] अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा एखादी कल्पना जशी आहे त्यापेक्षाही खूप वाढवून सांगितली जाते, तेव्हा तेथे 'अतिशयोक्ती अलंकार' ( Atishayokti Alankar ) होतो.
अतिशयोक्ती अलंकार उदाहरणे :-
१] गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र, सूर्य, तारे !२] या जमदग्नीच्या समोर उभे राहण्याचे तरी धाडस होईल का ?
३] जो अंबरी उफळता खूर लागलाहे । तो चंद्रमा निज तनुवरि डागलाहे ।।
४] ती रडली समुद्राच्या समुद्र.
५] तुझे पाय अस भासता, जणू हवेवर नाचतात.
६] दमडीच तेल आणलं, सासूबाईच न्हान झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरल तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरल तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
हे पण पहा :-शब्दांच्या शक्ती
७] दृष्टांत अलंकार म्हणजे काय?
एखाद्या विषयाचे वर्णन करून तो विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा सोपा दाखला किंवा उदाहरण देतात, तेव्हा त्यास 'दृष्टान्त अलंकार' ( Drushtant Alankar ) असे म्हणतात.
दृष्टांत अलंकार उदाहरणे :-
१] न कळता पद अग्नीवरी पडे। न करि दाह असे न कधी घडे।
अजित नाम वदो भलत्या मिसे।
अजित नाम वदो भलत्या मिसे।
सकळ पातक भस्म करीतसे॥
२] निवडी वेगळे क्षीर आणि पाणी।
राजहंस दोन्ही वेगळाली
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। येरागबाळाचे काम नोहे
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। येरागबाळाचे काम नोहे
३] लहानपण देगा देवा।
मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर।
ऐरावत रत्न थोर।
त्यासी अंकुशाचा मार||
८] विरोधाभास अलंकार म्हणजे काय?
जेव्हा बोलताना विरोध नकरता केवळ विरोधाचा आभास असतो. अथवा विधानात वरकरणी विरोधाभास दिसतो; पण वास्तविक तसा विरोध नसतो. त्यावेळी 'विरोधाभास अलंकार’ ( Virodhabhas Alankar ) होतो.
विरोधाभास अलंकार उदाहरणे :-
२] स्वतःसाठी जगलास तर मेलाच, दुसऱ्यासाठी मेलास तरच जगलास !
३] जरी आंधळी मी तुला पाहते.
४] वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा ।
५] मरणात खरोखर जग असते.
हे पण पहा :- विराम चिन्हे
हे पण पहा :- विराम चिन्हे
९] चेतनगुणोक्ती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा निर्जीव वस्तू किवा मानवी कल्पनीक गोष्टी या सजीवांप्रमाणे कृती करतात असे वर्णन केले जाते तेव्हा 'चेतनगुणोक्ती अलंकार’ ( Chetnagunokti Alankar ) होतो.
चेतनगुणोक्ती अलंकार उदाहरणे :-
काळोखाच्या उशी वरुनी;
२] कुटुंब वत्सल इथे फणस हा।
कटिखांद्यावर घेऊन बाळे
कटिखांद्यावर घेऊन बाळे
३] चाफा बोलेना, चाफा चालेना।
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।
४] धक्क्यावरच्या अजून बोटी
साखरझोपेमधी फिरंगी
हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार
साखरझोपेमधी फिरंगी
हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार
१०] अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे काय?
एखाद्या विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो किंवा सामान्य विधान / सिद्धांताच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जाते तेव्हा 'अर्थातरन्यास अलंकार' ( Arthantrnyas Alankar )
अर्थांतरन्यास अलंकार उदाहरणे :-
१] फूल गळे, फळ गोड जाहलेबीज नुरे, डौलात तरु दुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का ? मरीण अमरता ही न खरी
२] राम कृष्णही आले गेले,
त्या विना जग का ओसची पडले ?
जन पळभर म्हणतील हाय हाय,
मी जाता त्यांचे राहील काय?
त्या विना जग का ओसची पडले ?
जन पळभर म्हणतील हाय हाय,
मी जाता त्यांचे राहील काय?
३] कठीण समय येता कोण कामास येतो?
४] अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा ।
वाम बाहूवर गालही डावा
११] स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू किवा प्रसंग यांचे हुबेहूब; पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला ‘स्वभावोक्ती अलंकार’ ( Swbhavokti Alankar ) म्हणतात.
स्वभावोक्ती अलंकार हा अतिशयोक्ती अलंकाराच्या अगदी विरुद्ध आहे
स्वभावोक्ती अलंकार उदाहरणे :-
१] अंग वक्र, अधरि घरी पावा
गोपवेष हरि तोची जपावावाम बाहूवर गालही डावा
२] चिमुकली पगडी झळके शिरी,
चिमुकली तलवार घरे करी,
चिमुकला चढवी वर चोळणा,
चिमुकला सरदार निधे रणा ॥
चिमुकली तलवार घरे करी,
चिमुकला चढवी वर चोळणा,
चिमुकला सरदार निधे रणा ॥
३] मातीत पसरले ते अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडूर निष्कलंक.
केले वरी उदर पांडूर निष्कलंक.
४] दुजा आईच्या पुसी नयनाला ।
दृश्य हे बघून । निवतील का ते कविनयन ।
दृश्य हे बघून । निवतील का ते कविनयन ।
१२] व्याजस्तुती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा आतून निंदा, पण बाहेरून स्तुती किंवा बाहेरून निंदा परंतु आतून स्तुती असे वर्णन केलेले असते, तेव्हा 'व्याजस्तुती अलंकार' ( Vyajastuti Alankar ) होतो.
व्याजस्तुती अलंकार उदाहरणे :-
लाडू असा बरवा, सुगरण तू खरी ।
२] होती वदन-चंद्राच्या दर्शनाचीच आस ती |
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती? ||
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती? ||
१३] पर्यायोक्ती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्षरीतीने सांगीतली जाते तेव्हा त्याला ‘पर्यायोक्ती अलंकार’ ( Paryayokti Alankar ) असे म्हणतात.
पर्यायोक्ती अलंकार उदाहरणे :-
२] तू तर उंबराचे फूल आणायला सांगितलेस.
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
१४] सार अलंकार म्हणजे काय?
वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो, तेव्हा ‘सार अलंकार’ ( Sar Alankar ) होतो.
सार अलंकार उदाहरणे :-
मतीविना नीती गेली।
नीती विना गती गेली ॥
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥
२] आधिच मर्कट तशातही मद्य प्याला
झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला
झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला
१५] अन्योक्ती अलंकार म्हणजे काय?
दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे; परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे 'अन्योक्ती अलंकार' ( Anyokti Alankar ) होय.
अन्योक्ती अलंकार उदाहरणे :-
१] सांबाच्या पिंडीते बसशी खेद्नी वृश्चिका आज
परि तो आश्रय सुटता खेटर उत्तरील रे तुझा माज
परि तो आश्रय सुटता खेटर उत्तरील रे तुझा माज
२] येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यासि किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला म्हणतील काक
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यासि किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला म्हणतील काक
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
१६] ससंदेह अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था निर्माण होते, त्या वेळी ‘ससंदेह अलंकार’ ( Sasandeh Alankar ) होतो.
ससंदेह अलंकार उदाहरणे :-
२] कोणता मानू चंद्रमा,
भूवरीचा की नमींचा चंद्र कोणता वदन कोणते ?
१७] भ्रान्तिमान अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे ‘भ्रान्तिमान अलंकार’ ( Bhrantiman Alankar ) होतो.
भ्रान्तिमान अलंकार उदाहरणे :-
पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ॥
घालीन अंजन अशा मतिने तटाकी ।
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ॥
२] पलाशपुष्प मानोनि शुकचंचू मध्ये अलि
तोही जांभूळ मानोनी, त्यास चोचीमध्ये धरी ॥
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
तोही जांभूळ मानोनी, त्यास चोचीमध्ये धरी ॥
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
१८] व्यतिरेक अलंकार म्हणजे काय?
जेव्हा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखविले जाते, तेव्हा ‘व्यतिरेक अलंकार’ ( Vyatirek Alankar ) होतो.
व्यतिरेक अलंकार उदाहरणे :-
२] कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान
३] कर्ण उणा ठरावा इतका तो दानशूर होता.
४] अमृताहूनि गोड नाम तुझे देवा,
५] तू माउलीहून मवाळ ।
चंद्राहूनही शीतल ।
पाणियाहूनही पातळ ।
पाणियाहूनही पातळ ।
कल्लोळ प्रेमाचा ।।
६] चंद्राची युवतीमुखास उपमा देती कशाला कवी,
हे पूर्वी न मला रहस्य कळले,
चित्रातले हे मुख पाहूनी मजला अपूर्णच गमे,
चंद्रास हे लाजवी की याच्यावर निष्कलंक विहरे बुद्धसवे कौतुके.
हे पूर्वी न मला रहस्य कळले,
चित्रातले हे मुख पाहूनी मजला अपूर्णच गमे,
चंद्रास हे लाजवी की याच्यावर निष्कलंक विहरे बुद्धसवे कौतुके.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
१९] असंगती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे जेथे वर्णन असते त्यास 'असंगती अलंकार' ( Asangati Alankar ) म्हणतात.असंगती अलंकार उदाहरणे :-
१] गुलाब माझ्या हृदयी फुलला । रंग तुझ्या गालावर खुलला ।
२] काटा माझ्या पायी रुतला ।
शूल तुझ्या उरी कोमल का ?
२०] व्याजोक्ती अलंकार म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न केला जातो तेथे 'व्याजोकक्ती अलंकार' ( Vyajokti Alankar ) होतो.व्याजोक्ती अलंकार उदाहरणे :-
१] येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे।डोळ्यांत काय गेले हे ? म्हणुनी नयनापुसे।
आम्ही तुम्हाला येथे अलंकार व त्याचे प्रकार मराठी ( Alankar v Tyache Prakar in Marathi | Alankar in Marathi | Marathi Alankar ) व त्याची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला अलंकार व त्याचे प्रकार मराठी ( Alankar v Tyache Prakar in Marathi | Alankar in Marathi | Marathi Alankar ) संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी अलंकार व त्याचे प्रकार ( Alankar v Tyache Prakar in Marathi | Alankar in Marathi | Marathi Alankar ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box