मराठी बोधकथा - भित्रा सशाची कैफियत
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एकदा एका जंगलात एके दिवशी जोराचा वारा वहात होता. त्यामुळे जंगलात वाऱ्याचा आवाज येत होता. ससा फार घाबरला. तो पळत जाऊन झाडाच्या ढोलीत लपला. अचानक त्याने जवळच मोठा आवाज ऐकला. त्याने ऊडी मारली व तो रानात पळू लागला.
पळता पळता ओरडला, पळा, पळा आकाश पडत आहे." त्याला वाटेत हरिण भेटले. हरणाने विचारले, "तु का पळत आहेस?" ससा म्हणाला, "तु आवाज नाही ऐकलास? आभाळ पडत आहे." त्याच्या बरोबर हरिणसुद्धा धावू लागले. दोघांना झेब्रा भेटला. सर्व ऐकल्यावर तो देखील पळू लागला. हे तिघे पळत असताना एका मागोमाग एक असे जिराफ, कोल्हा, लांडगा आणि अनेक प्राणी पळू लागले. सिंहाने आवाज ऐकला आणि तो गुहेबाहेर आला. त्याने विचारले, "काय झाले?" सर्व प्राणी जोरात ओरडले, "आभाळ पडत आहे." ससा म्हणाला, "मी आभाळाचा तुकडा पडताना पाहिला आहे." सिंह म्हणाला, "तु मला ती जागा दाखवतोस?"
ससा सर्व प्राण्याना घेऊन झाडा जवळ आला. तिथे एक आंबा पडला होता. सिंह म्हणाला, "हा पहा आभाळाचा तुकडा !" आता सर्व प्राण्यांनी लाजेने मान खाली घातली.
बोध :- अफवेमुळे गोंधळ होतात.
तुम्हाला मराठी बोधकथा - भित्रा सशाची कैफियत | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box