प्रामाणिक लाकुडतोड्या
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एका गावात सखाराम एक गरीब माणूस राहत होता. तो. लाकूड तोडून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचे कुटुंब मोठे होते. एकदा सखाराम रानात लाकडे तोडण्यास गेला असताना, त्याची कुऱ्हाड एका विहिरीत पडली. त्याने खुप प्रयत्न केला. पण कुऱ्हाड मिळाली नाही. तो रडू लागला.
अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, "करीम तुला काय हवे आहे?" त्याने डोके उचलले, तर समोर एक परी उभी होती. तो म्हणाला, "माझी कुऱ्हाड तळ्यात पडली आहे " परी म्हणाली, "काळजी करू नकोस मी तुला कुऱ्हाड काढून देते" असे म्हणून परी तळ्यात उतरली.
परी तळ्यातून एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. तिने विचारले, "ही कुऱ्हाड तुझी आहे का?" करीम म्हणाला, "नाही." परी पुन्हा तळ्यात उतरली. ह्या वेळी परीने चांदीची कुऱ्हाड काढली. करीम म्हणाला, " ही माझी नाही."
तिसऱ्या वेळी परीने करीमची कुऱ्हाड काढली. ते पाहुन करीमला आनंद झाला. परी करीमच्या प्रामाणिकपणावर खुष झाली आणि तिने करीमला तिन्ही कुऱ्हाडी दिल्या व आर्शिवाद दिला.
बोध :- प्रामाणिकपणाचे फळ.
तुम्हाला मराठी बोधकथा - प्रामाणिक लाकुडतोड्या | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box