मराठी बोधकथा - कावळ्यांची शर्यत
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एकदा दोन कावळ्यांमध्ये शर्यत लागली. जास्त उंच कोण उडू शकतो हे पाहण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी सारख्या आकाराची पिशवी घेऊन उडण्याचे ठरवले. पहिल्या कावळ्याने मिठाने भरलेली पिशवी घेतली. त्याने विचार केला, "काळे ढग आले असल्यामुळे पाऊस पडेल." दुसरा कावळा पहिल्याला हसला. त्याने कापसाने भरलेली पिशवी घेतली. त्याने विचार केला, "हा किती मुर्ख आहे. त्याने मिठाने भरलेली पिशवी घेतली आहे.
शर्यत मी निश्चित जिंकेन." दोन्ही कावळे तयार झाले. वेळ झाल्यावर दोघे उडू लागले. ते वरवर जाऊ लागले. इतक्यात पाऊस सुरू झाला. पहिल्या कावळ्याच्या पिशवीतील मिठ विरघळले. दुसऱ्या कावळ्याच्या पिशवीतील कापूस भिजून जड झाला. पहिल्या कावळ्याने शर्यत जिंकली.
बोध :- दूरदृष्टी ठेवणे फायदेशीर असते.
तुम्हाला मराठी बोधकथा - कावळ्यांची शर्यत | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box