मराठी बोधकथा - कोल्हा आणि कासव | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

मराठी बोधकथा - कोल्हा आणि कासव | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi

मराठी बोधकथा - कोल्हा आणि कासव

Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi

मराठी बोधकथा - कोल्हा आणि कासव | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
                  एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता त्याला स्वतःच्या हुशारी बद्दल गर्व होता. तो म्हणत असे, "मी सर्व प्राण्यात हुशार आहे.

            एक दिवस तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याला काही मिळाले नाही. त्याला भूक सहन झाली नाही. अखेर त्याला एक कासव दिसले. त्याला खुप आनंद झाला. त्याने उडी मारून कासवाला पकडले. कोल्ह्याने कासवाचे कवच फोडण्याचा प्रयत्न केला. पण ते काही फुटेना. कासव धुर्तपणे म्हणाले, "तु मला पाण्यात का बुडवत नाहीस? म्हणजे माझे कवच मऊ होईल व मला तु सहजपणे खाऊ शकशील." भुकेने व्याकुळ झालेल्या कोल्ह्याने, काही विचार न करता कासवाला तळ्यात ढकलले. 

            कासव कोल्ह्याच्या हातातून सहज निसटले व आनंदाने पाण्यात पोहू लागले. ते तळ्याच्या मध्यभागी गेले आणि म्हणाले, "कोल्ह्या स्वतःला फार हुशार समजू नकोस."

बोध :- जसे पेराल तसेच उगवेल किवा जशास तसे.


          तुम्हाला मराठी बोधकथा - कोल्हा आणि कासव | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad