Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 5, 2023

Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे

Benefits of Reading

Vachanache Fayade

वाचनाचे फायदे

Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे

Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे:-

          "वाचल तर वाचल" असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतलेच आहे. तुम्ही वाचन कराल तर तुम्ही आजच्या युगात जगू शकाल असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे वाचन ही फार महत्वाची बाब आहे. ज्या व्यक्तीचे वाचन अधिक असते त्याची बुद्धि अधिक प्रगल्भ होते. तर असेच काही Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे  आहेत ते आज आपण बघणार आहोत.


वाचनाचे फायदे ( Benefits of reading | Vachanache Fayade )

०१) वेळेचा सदुपयोग होतो :-

काही लोकांना वेळ पुरत नाही व नुसतेच बसून कंटाळतात. जसे कोरोना काळातील लॉकडाऊन. असे म्हणतात की, "खाली दिमाग शैतान का घर" हे खरंच आहे कारण तेव्हा माणसाच्या डोक्यात नको असलेले विचारच जास्त येतात. त्यावर एकाच उपाय रिकाम्या वेळेत वाचन करणे. ज्यामुळे आपले ज्ञानही वाढते व वेळही छान जातो. तसेच वेळेचा सदुपयोगही होतो.

०२) माहितीचा साठा होतो :-

वाचनामुळे आपल्याला भरपूर व नाविन्यपूर्ण व भरपूर माहिती मिळते त्यामुळे आपल्या मेंदूत माहितीचा साठा होतो.

०३) चांगले संस्कार मिळतात :-

धार्मिक ग्रंथ तसेच समाजसुधार, चांगल्या व्यक्तींची आत्मचरित्रे यामुळे चांगले संस्कार होण्यास मदत होते.

०४) संयमी बनतो :-

प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये राग ही भावना असतेच परंतु आपल्याला त्यावर संयम कसा मिळवावा हे सुचत नाही परंतु वाचनाने त्या व्यक्तीची कोणत्याही गोष्टीवर विचार करण्याची शक्ती वाढलेली असते व तो विचार करून बोलतो प्रत्येक गोष्टीला पोसिटीव्हली घेऊन विचार करतो व आपल्या मनावर ताबा मिळवतो मनावर ताबा मिळवला की आपोआपच त्यात संयम येतो.

०५) संवादकौशल्य सुधारते :-

व्यक्ती म्हटला म्हणजे तो एक समाजशील प्राणी आहे व त्याला समाजात राहणे आलेच म्हणजे त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांशी संवाद साधवाच लागतो. हा संवाद चांगला व्हावा यासाठी त्याच्याकडे बोलण्याचे तारतम्य असावे नाही तर ध चा मा व्हायला वेळ लागत नाही हे संवाद कौशय वाचनातून विकसित करता येते.

०६) समजूतदारपणा येतो :-

वाचनामुळे आपण कोणाशी कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याविषयी एक संकेत मिळतो. थोर व्यक्तींनी कश्या समजूतदार पद्धतींनी आपले कार्य केले यावरून देखील आपल्यात समजूतदारपणा येतो.

०७) हजरजबाबीपणा येतो :-

वाचनामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता आपोआपच विकसित होते. कारण प्रत्यक्ष प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता आपल्याला वाचनातून मिळते त्यामुळे आपल्यात हजरजबाबीपणा आलेला असतो.


०८) खरा मित्र मिळतो :-

वाचन केल्याने पुस्तक आपला खरा मित्र बनतो जो असपल्याला कधीही फसवत नाही तसेच वाईट सल्ले देत नाही व चोवीस तास आपल्या सोबत राहू शकतो.

०९) चालू घडामोडी कळतात :-

वाचनामुळे आपल्या आवती-भोवती, तसेच जिल्ह्यात, राज्यात, देशात व विदेशात सद्या कोणत्या घटना घडत आहेत तसेच काय नवीन होत आहे हे समजते.

१०) शब्दकोश वाढतो होते :-

कोणतीही भाषा सहज व प्रभावी वापरासाठी आपल्याकडे सर्वात अगोदर त्या भाषेची शब्द संपत्ती असणे आवश्यक असते. व शब्द संपत्ती वाढवण्याचे काम वाचनामुळे सहज शक्य होते.

११) आत्मविश्वास वाढतो :-

आत्मविश्वास ही फार महत्वाची बाब आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते आपल्याला तेच काम मिळाले की आपला आत्मविश्वास डगमगतो. वाचनामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास निर्माण होतो.

१२) छंदाची जोपासना होते :-

प्रत्यक्ष व्यक्तीला काहींना काही छंद असतो. हो प्रत्येकाला तो छंद जोपासण्यास वेळ मिळत नाही परंतु वाचन हा एक असा छंद आहे की तो घरी, प्रवासात किंवा कुठेही जोपासू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या जास्त साहित्यांची गरज नसते. व ते साहित्य सहज कुठेही पिशवीत घेऊन शकतो.

१३) स्मरणशक्ती वाढते :-

स्मरण शक्ती वाढवण्यासाठी वाचन हे एका शस्त्रा प्रमाणे काम करते. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

१४) बुद्धी विकास होतो :-

बुद्धी हे एक रिकाम्या खोक्या सारखे असते त्यात चांगले विचार गेले तर चांगले होते व वाईट विचार गेले तर वाईट त्यामध्ये हे चांगले विचार भरण्याचे काम आपण चांगली पुस्तके वाचून साध्य करू शकतो.

१५) सकारात्मक विचार करण्याची सवय लागते :-

आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मक विचाराचे लोक फिरत असतात त्याचाच प्रभाव आपल्यावर पडण्याची शक्यता असते. परंतु आपण बाहेर जाणे तर थांबवू शकत नाही मग सकारात्म विचाराची पुस्तके वाचून ते नकारात्मक विचार कमी करू शकतो.

१६) योग्य अयोग्यची समज होते :-

कोणती गोष्ट योग्य व कोणती अयोग्य याचा निर्णय करण्यात प्रत्येक व्यक्ती गुरफटळेल असतो. हाच निर्णय घेण्यासाठी आपल्याला वाचनाची मदत होते. त्यामुळे योग्य अयोग्य याची समज होते.


१७) मेंदू सक्षम बनतो :-

वाचनाने आपल्या नवनवीन कल्पना सुचतात, मेंदूला चालना मिळते व आपला मेंदू सक्षम होण्यासही मदत होते.

१८) सर्वांगीण विकास होतो :-

वाचनाने आपण सर्व बाजूनी विचार करायला शिकतो कारण आपल्या मानसिक, भावनिक, व्यवहारिक इ. सर्व प्रकारचे वाचन करण्यास मिळते म्हणून सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

१९) सारासार विचार करण्यची क्षमता विकसित होते :-

वाचनामुळे आपली विचार करण्याची शक्ती प्रगलब झालेली असते. त्यामुळे आपण कोणताही निर्णय सारासार विचार करून घेऊ शकतो.

२०) विचारकौशल्य वाढते :-

वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते व सर्व बाजूनी विचार करू शकतो त्यामुळे त्याचे विचार कौशल विकसित होते.

२१) चांगले आकलन होते :-

वाचनामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचे आकलन उत्तम होते.

२२) भावनिक विकास होतो :-

कथा, कादंबऱ्या वाचनाने आपल्याला प्रत्येक पात्राची तस वागण्यामागाची भावना आपल्याला कळते व यातून देखील आपण आपला भावनिक विकास करू शकतो.

२३) समयसूचकतेची जान होते :-

कोणता निर्णय केव्हा व कोणत्या वेळी घ्यावा याला फार महत्व असते परंतु आपण नेमके तेव्हाच चूक करतो ही चूक व्हायला नको यासाठी आपल्याकडे समय सुचकता असणे गरजेचे आहे. ही समयसुचकता आपण वाचनातून साध्य करू शकतो.

२४) मेंदूचा व्यायाम होतो :-

मेंदूचा व्यायाम होणे फार गरजेचे असते. असे म्हणतात की, "खाली दिमाग शैतान का घर" हे खरंच आहे कारण तेव्हा माणसाच्या डोक्यात नको असलेले विचारच जास्त येतात. त्यावर एकाच उपाय रिकाम्या वेळेत वाचन करणे. ज्यामुळे आपले ज्ञानही वाढते व वेळही छान जातो.


२५) एकाग्रता वाढते :-

मनाच्या एकाग्रतेसाठी तुम्हाला आवडणाऱ्या विषयाची पुस्तके वाचावीत मग ती गोष्ट, कथा, कादंबरी, कविता जी असतील ती पण ती तुम्हाला आवडणारी असावीत.

२६) कल्पकता वाढले :-

आज पर्यंत जे काही शोध लागले असतील किंवा साहित्य लिहिले गेले असेल ते दुसऱ्या कोणाच्या तरी गोष्टीवरून प्रेरित होऊनच झालेले आहेत. आपण पण असेच वाचन केल्यास नक्कीच काहीतरी नवीन निर्माण करू शक्ती थोडक्यात आपली कल्पकता वाढवू शकतो.

२७) व्यक्तिमत्व विकास होतो :-

वाचनाने आपण नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो.

२८) यशस्वी होण्यासाठी मदत होते :-

कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला परीक्षा ह्या अनिवार्य असतात. त्या परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला वाचन करावेच लागते.

२९) ताण-तणाव कमी होतो :-

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीच्या मेंदू व मनावर ताण असतो हा ताण कमी करण्याचळे काम वाचन नक्कीच करेल.

३०) एकलकोंडेपणा घालवण्यासाठी प्रभावी :-

प्रवासात, नवीन ठिकाणी गेल्यास किंवा घरी कोणी नसल्यास आपल्याला एकलकोंडेपणा वाटतो अशावेळी वाचन केल्यास तुमचा एकलकोंडेपणा घालवता येईल.

३१) ज्ञानात वृद्धी होते :- 

वाचनाने आपल्याला खूप सारी ज्ञान वाढविणारी माहिती मिळते त्यामुळे आपल्या ज्ञानात वृद्धी होते.

          तुम्हाला Benefits of reading | Vachanache Fayade | वाचनाचे फायदे  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad