WORLD NURSES DAY
१२ मे जागतिक परिचारिका दिन
International Nurses Day
|  | 
| १२ मे जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day | 
१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day | World Nurses Day म्हणून का साजरा केला जातो.
           इ.स. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आद्य परिचारिका (Nurse) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. म्हणून १२ मे हा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day | World Nurses Day म्हणून साजरा केला जातो.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
            फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० साली झाला. त्या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची वैद्यकीय सेवा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे देखील म्हणतात. अतिशय श्रीमंत घराण्यात जन्म होऊन देखील देवाने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. 
          रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day" म्हणून साजरा केला जातो. अश्या या लेडी विथ द लॅम्प फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा मृत्यू १३ ऑगस्ट १९१० साली झाला.
१२ मे जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day
हार्दिक शुभेच्छा.......!
          तुम्हाला १२ मे जागतिक परिचारिका दिन | International Nurses Day | World Nurses Day ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
 

 
 
 
 
 
 
 
 
 The Study Katta Team
The Study Katta Team
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box