क्रियापदांचे अर्थावरून प्रकार | Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 14, 2023

क्रियापदांचे अर्थावरून प्रकार | Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs

 क्रियापदांचे अर्थावरून प्रकार

Types of verbs by meaning

Kriyapadache arth | Meaning of verbs

क्रियापदांचे अर्थावरून प्रकार | Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs

क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) :- 

          क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) .


क्रियापदाचे अर्थ म्हणजे काय?

            क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध न होता आज्ञा, कर्तव्य, इच्छा, संकेत, विनंती, उपदेश इत्यादी भावार्थ व्यक्त होतात यालाच व्याकरणात कियापदाचे अर्थ ( Kriyapadache arth | Meaning of verbs ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

अर्थउदाहरण
स्वार्थ  राम अभ्यास करतो.
स्वार्थ सचिन सहलीला गेला.
संकेतार्थपहिला नंबर आला की मी पेढे वाटेल.
संकेतार्थजर अभ्यास केला तर यश मिळते.
आज्ञाराम अभ्यास कर.
आज्ञारामू पाणी आण.
सौम्य आज्ञायेवढा लाडू घ्या पाहू.
अनुमोदक आज्ञामी आत येऊ?
प्रार्थनादेवा मला सदबुधी दे.
प्रार्थनादेवा मला पास कर.
आशीर्वादईश्वर तुम्हाला दिर्घायुश्वर देवो.
आशीर्वादसुखी रहा.
उपदेशमुलांनो नेहमी सत्य बोला.
तर्कती बहुदा शाळेत असावी.
सल्लाऔषध वेळेवर घ्या.
विनंतीत्याला तू हे सांगच.
कर्तव्यमुलांनी शिस्त पाळावी.
योग्यताअंगात धैर्य असणाऱ्यांनीच ते करावे.
इच्छाआज पाऊस पडावा.
विनंतीकृपया रांगेत उभे रहावे.


क्रियापदाचे अर्थानुसार प्रकार कोणते किती?

            मराठी भाषेमध्ये क्रियापदाचे  अर्थानुसार चार प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.

अर्थउदाहरण
स्वार्थ ( Swarth )
२ आज्ञार्थ ( Aadnyarth )
विंध्यर्थ ( Vindyarth )
संकेतार्थ ( Sanketarth )


१) स्वार्थ क्रियापद म्हणजे काय?

            ज्या क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होतो त्यास स्वार्थ क्रियापद ( Swarth Kriyapad ) म्हणतात.

उदाहरणार्थ :-

क्रउदाहरण
सुयश खेळायला गेला.
सुनिता अभ्यास करते.
माझा पगार झाला.
माझे जेवण झाले.
मी गावाला जात आहे.
मला दोन भाऊ आहेत.
काळ सूर्य उशिरा मावळला.
मला राग आला.
मला शाळेत जायचे नव्हते.
१०सचिनने शकत केले होते.


२) आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय?

            ज्या क्रियापदाच्या रुपावरून आशा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, सल्ला, उपदेश, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा यांचा बोध होतो त्यास आज्ञार्थी क्रियापद ( Aadnyarth Kriyapad ) म्हणतात.

आज्ञार्थी वाक्यात धातुला शक्यतो (अ,आ, ऊ) हे प्रत्येय असतात.

उदाहरणार्थ :-

अर्थउदाहरण
विनंतीत्याला तू हे सांगच.
आज्ञाराम अभ्यास कर.
आज्ञारामू पाणी आण.
सौम्य आज्ञायेवढा लाडू घ्या पाहू.
अनुमोदक आज्ञामी आत येऊ?
प्रार्थनादेवा मला सदबुधी दे.
प्रार्थनादेवा मला पास कर.
आशीर्वादईश्वर तुम्हाला दिर्घायुश्वर देवो.
आशीर्वादसुखी रहा.
उपदेशमुलांनो नेहमी सत्य बोला.
सल्लाऔषध वेळेवर घ्या.
उपदेशनेहमी खरे बोला.


३) विंध्यर्थ क्रियापद म्हणजे काय?

            ज्या क्रियापदाच्या रुपावरून कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता, तर्क, विनंती यांचा बोध होतो त्यास विंध्यर्थ क्रियापद ( Vindhyarth Kriyapad ) असे म्हणतात.
  • या प्रकारच्या वाक्यात आज्ञा प्रमाणे बंधन नसते
  • अशी वाक्य शक्यतो सर्वांना लागू पडणारे असतान
  • अशा वाक्यातील धातूंना (वावी, वे) प्रत्यय असते

उदाहरणार्थ :-

अर्थउदाहरण
तर्क  ती बहुदा शाळेत असावी.
तर्कतो कदाचीत बागेत असावा.
इच्छाआज पाऊस पडावा.
इच्छामला चांगले गुण मिळावे.
इच्छाअसावा सुंदर चॉकलेटचा बंगला.
विनंतीकृपया सत्कार्य करावे.
विनंतीकृपया रांगेत उभे रहावे.
योग्यताअंगात धैर्य असणाऱ्यांनीच ते करावे.
योग्यताअसे काव्य कुसुमाग्रजांनीच करावे.
कर्तव्यथोरांची आज्ञा पाळावी.
कर्तव्यमुलांनी शिस्त पाळावी.


४) संकेतार्थ क्रियापद म्हणजे काय?

            जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून असे केले असते तर तसे झाले असते अशा संकेताचा अर्थ बोध होतो त्यास संकेतार्थ क्रियापद ( Sanketarth Kriyapad ) असे म्हणतात.

            असे वाक्य जोडण्यासाठी शक्यतो (जर ... तर, म्हणजे, की) यासारख्या उभयान्वयी वाक्याचा वापर केलेला असतो.

उदाहरणार्थ :-

क्रउदाहरण
जमले तर मी येईल.
प्रयत्न केले तर यश मिळते.
काही झाले तरी मी बोलनारच.
जर अभ्यास केला तर यश मिळते.
पहिला नंबर आला की मी पेढे वाटेल.
तुम्ही पायी गेला असता तरी चाळले असते.
लवकर आलात म्हणजे आपण बागेत जाऊ.
अभ्यास केला तर पास होशील.
गुंतवणूक केली तर पुढे फायदा होईल.
१०व्यायाम केला तर आरोग्य चांगले राहील.


            आम्ही तुम्हाला येथे क्रियापदाचे अर्थ म्हणजे काय ? , क्रियापदाचे उदाहरण, क्रियापदांचे अर्थावरून प्रकार कोणते ? व किती ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला क्रियापदांचे अर्थावरून प्रकार ( Kriyapadache arth | Types of verbs by meaning | Meaning of verbs ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad