National Science Day | Theme of Science Day | Raman Effect | राष्ट्रीय विज्ञान दिवस - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 10, 2023

National Science Day | Theme of Science Day | Raman Effect | राष्ट्रीय विज्ञान दिवस

National Science Day

Theme of Science Day | Raman Effect

राष्ट्रीय विज्ञान दिवस

National Science Day  | Theme of Science Day | Raman Effect | राष्ट्रीय विज्ञान दिवस

राष्ट्रीय विज्ञान दिन ( National Science Day ) :-

            राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day ) हा दिवस प्रामुख्याने समाजामध्ये विज्ञानाचे जीवनात वाढत असलेले महत्व तसेच त्यांच्यात विज्ञाना विषयी जागरूकता व वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा आणि आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे, तो देशाचे भविष्य आहे त्याच्यात देखील विज्ञाना विषयी जागरूकता व वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करून त्याला त्याविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी भारताची राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय ( National Council of Science and Technology and Ministry of Science and Technology ) यांच्या मार्फत यांच्या २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन ( 28 February National Science Day ) साजरा केला जातो.


            राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day ) साजरा करण्यामागे शासनाचा फार मोठा उद्देश आहे. शासनाने मुख्यतः विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा दिवस साजरा केला असावा असे वाटते. कारण की आजचे युग हे विज्ञानाचे युग मानले जाते. विज्ञानाशिवाय विकास होणे संभाव नाही. आपला देश विकसित न होण्याचे सर्वात मोठे कारण आहे देशात फोफावत चाललेली अंधश्रद्धा. ती कमी करण्यासाठी विज्ञानाची फार आवश्यक आहे. जेव्हा त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे महत्व पटेल व त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात आचार व विचार करायला सुरवात करतील तेव्हाच ही अंधश्रद्धा कमी होईल. यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना शास्र्ज्ञान विषय भाषण, निवंध, उपक्रम, प्रश्नोत्तर स्पर्धानचे आयोजन करावे तसेच छोटे छोटे प्रयोग करण्यास सांगून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित त्यांचे प्रदर्शन भरवले गेले पाहिजे, व यातून नंबर काढून त्यांना बक्षीस दिले गेले पाहिजे यामुळे त्यांना आवड निर्माण होऊन प्रेरणा देखील मिळेल तेव्हाच तर ते पुढे जाऊन मोठे शास्रज्ञ बनतील. मग आपल्या देशाला विकसित व महासत्ता बनन्या पासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होणे गरजेचे आहे.

            राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day ) २८ फेब्रुवारी या दिवशीच का साजरा केला जातो यामागे पण इतिहास आहे तो म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण ( Dr.C.V.Raman ) यांनी लावलेल्या रमन इफेक्टचा शोध (Discovery of the Raman Effect).


कोण होते हे डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण ( Dr.C.V.Raman ) ?

            डॉ.सी.व्ही.रमन ( Dr.C.V.Raman ) अर्थात डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे झाला. रमन हे अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षीच शालेय शिक्षण संपवून १५ व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर ते कोलकाता येथे डेप्युटी अकौटंट जनरल पदावर रुजू झाले पण नोकरीमध्ये त्यांच मन रमेना म्हणून ते कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अगदी कमी पगाराच्या नोकरीत रुजू झाले. रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि राधाकृष्णन हे दोन पुत्र होते.

           १९२१ मध्ये कलकत्ता विद्यापीठाकडून त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये 'भारतीय तंतूवाद्ये' हा शोधनिबंध सादर केला. पुढे युरोपातून समुद्र मार्गे भारतात परत येत असताना त्यांना आकाशातील निळ्या रंगाला पाहून त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचेच का दिसते? अशा प्रश्नांमधून त्यांचे संशोधन सुरू झाले आणि त्यातून त्यांनी भारतात परतल्यावर पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले आणि २८ फेब्रुवारी १९२८ रोजी त्यांनी रमन इफेक्टचा शोध यातूनच उदयास आला. यातूनच साऱ्या जगाला आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली.


            रमन इफेक्टचा ( Raman Effect ) संशोधनाबद्दल त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि आशियातील पहिले व्यक्ती होते. तसेच १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याच कारणामुळे सर सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी विज्ञानविषयक अनेक बाबींवर चर्चा, चिंतन आणि उपक्रम राबवून सी. व्ही. रमन यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला जातो. 

            राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day ) हा पहिल्यांदा सन १९८७ मध्ये साजरा करण्यात आला. सर सी. व्ही. रामन यांच्या या महत्त्वपूर्ण शोधानंतर जवळपास सहा दशकांनंतर, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दळणवळण परिषदेने (National Science and Technology Communication Council). १९८६ मध्ये सरकारला २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली. म्हणून, १९८७ पासून, राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी भारतीय शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर संबंधित ठिकाणी साजरा केला जातो. हा दिवस देशातील संशोधकांच्या प्रतिभेला तसेच त्यांच्या दृढ निश्चयाला सलाम करण्याचा आहे. समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य ध्येय म्हणजे देशातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती अविरत कायम ठेवणे.


            दरवर्षी विज्ञान दिनाची थीम ( Theme of Science Day ) ठरविण्यात येतात त्या पुढील प्रमाणे आहेत.

विज्ञान दिनाची थीम | Theme of Science Day

थीम वर्षविज्ञान दिनाची थीम

१९९९

आपली बदलती पृथ्वी

२०००

मूलभूत विज्ञानात रस निर्माण करणे

२००१

विज्ञान शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञान

२००२

पश्चिमेकडून संपत्ती

२००३

जीवन प्रोफाइल - डीएनएची ५० वर्षे आणि IVF ची २५ वर्षे

२००४

समाजात वैज्ञानिक जागरूकता वाढवणे

२००५

भौतिकशास्त्र साजरा करत आहे

२००६

आपल्या भविष्यासाठी निसर्गाचे पालनपोषण करा

२००७

प्रति सामग्री उच्च उत्पन्न

२००८

पृथ्वी ग्रह समजून घेणे

२००९

विज्ञानाच्या मर्यादा ढकलणे

२०१०

शाश्वत विकासासाठी लैंगिक समानता, विज्ञान आणि तंत्रज्ञान

२०११

दैनंदिन जीवनात रसायनशास्त्र

२०१२

स्वच्छ ऊर्जा पर्याय आणि विभक्त सुरक्षा

२०१३

अनुवांशिकरित्या सुधारित पिके आणि अन्न सुरक्षा

२०१४

वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन द्या

२०१५

राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान

२०१६

देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक मुद्द्यांवर लोकांची प्रशंसा वाढवण्याचा उद्देश आहे

२०१७

विशेष अपंग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान

२०१८

शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान

२०१९

लोकांसाठी विज्ञान आणि लोकांसाठी विज्ञान

२०२०

विज्ञानातील महिला

२०२१

'एसटीआयचे भविष्य: शैक्षणिक कौशल्ये आणि कामावर परिणाम

२०२२

शाश्वत भविष्यासाठी S&T मध्ये एकात्मिक दृष्टीकोन

२०२३

जागतिक आरोग्यासाठी जागतिक विज्ञान


          तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day  | Theme of Science Day | Raman Effect ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad