ONE WORD SUBSTITUTION IN MARATHI
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
Shabd Samuhabadal Ek Shabd
शब्दसमूहाबद्दल एक शब्द ( One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) :-
            शब्दसमूहाबद्दल एक शब्द ( One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द ( One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) .
शब्द म्हणजे काय ?
            ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास शब्द ( Shabd / Words )  असे म्हणतात.
उदाहरणार्थ : -
खेळणे, आवड, सवय, वाचन, बोलणे, कप, कमळ, हत्ती, खबरदारी, खळखळाट इ.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ?
            अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो या अश्या शब्दसमुहातून जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd ) होय.
उदाहरणार्थ :-
शब्दसमूह एक शब्द पायांत पादत्राणे न घालता अनवाणी	 शिल्लक राहिलेले उर्वरित	 मडकी बनविणारा कुंभार	 केलेले उपकार विसरणारा कृतघ्	 दुसऱ्याच्या ताब्यात असलेला अंकित	 लग्नात द्यावयाची भेट आहेर	 मोजता येणार नाही इतके असंख्य	 देव आहे असे मानणारा आस्तिक	 
| शब्दसमूह | एक शब्द | 
|---|---|
| पायांत पादत्राणे न घालता | अनवाणी | 
| शिल्लक राहिलेले | उर्वरित | 
| मडकी बनविणारा | कुंभार | 
| केलेले उपकार विसरणारा | कृतघ् | 
| दुसऱ्याच्या ताब्यात असलेला | अंकित | 
| लग्नात द्यावयाची भेट | आहेर | 
| मोजता येणार नाही इतके | असंख्य | 
| देव आहे असे मानणारा | आस्तिक | 
शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One word substitution In Marathi | Shabd Samuhabadal Ek Shabd List ) याची यादी / उदाहरणे तुम्हाला अभ्यासासाठी येथे देण्यात आलेली आहेत. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
One word substitution In Marathi
Shabd Samuhabadal Ek Shabd
शब्द    =    शब्दसमूह
अनुज = सर्वात शेवटी जन्मलेला
अप्सरा = देवलोकातील सुंदर स्त्रिया
अतिथी = घरी पाहुणा म्हणून आलेला
अनावर = आवरता येणार नाही असे
अविनाशी = कधीही नाश न पावणारा
अनुपम = ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे
अवर्णनीय = वर्णन करता येणार नाही असे
अविस्मरणीय = ज्याचा विसर पडणार नाही असा
अंगाईगीत = लहान मुलाला झोपवण्यासाठी गायिलेले गाणे.
अल्पसंतुष्ट = थोडक्यात समाधान मानणारा
अप्पलपोटा = स्वतःच्या फायद्याचे पाहणारा
अजातशत्रू = ज्यास कोणीही शत्रू नाही असा
अजिंक्य = ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा
अनाथाश्रम = निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था
अल्पसंतुष्टी = थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती
अभूतपूर्व = पूर्वी कधीही न घडलेले
अश्रुतपूर्व = पूर्वी कधीही न ऐकलेले
अपक्ष = कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
अनुयायी = नेत्याचे अनुकरण करणारे
अनावरण = पडदा दूर करणे
अनाकलनीय = न कळण्यासारखे
अंकुश = हत्तीला वश करण्याचे साधन
अजर = ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा
अबदारखना = स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा
अवीट = ज्याला कधीही वीट नाही असे
अभाव = एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती.
आशीर्वाद = थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा
अष्टपैलू = विविध बाबींत प्रवीण असलेला
अथांग = ज्याचा थांग लागत नाही असा.
अपरिहार्य = न टाळता येणारे
अविनाशी = कधीही नाश न पावणारे
अननुभवी = अनुभव नसलेला
अविवाहित = ज्याचा विवाह झाला नाही असा
अर्धचंद्र = देणे हकालपट्टी करणे
अष्टावधानी = अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा
अत्युच्च = अतिशय उंच असणारा
अन्योक्ती = एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे.
अनवाणी = पायात पादत्राणे न घालता
अनमोल = ज्याची किंमत होऊ शकत नाही असे
अनाथ = कोणाचाही आधार नाही असा
अमर = ज्याला कधीही मृत्यू नाही असा
अन्नदाता = अन्न देणारा
अतुलनीय = तुलना करता येणार नाही असे
असीम = ज्याला सीमा नाही असा.
अप्रस्तुत = विषयाला सोडून बोलणे
अन्नछत्र = मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
आपादमस्तक = संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत
आदिवासी = अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी
आत्मवृत्त = स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र
आस्तिक = देव आहे असे मानणारा
आसेतुहिमाचल = हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत
आगंतुक = सूचना न देता येणारा, अतिथी
आजानुबाहू = ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा
आभास = नसलेली गोष्ट आहे असे वाटणे
आहेर = लग्नात द्यावयाची भेट
आल्हाददायक = मनाला आल्हाद देणारा
आकाशगंगा = आकाशातील ताऱ्यांचा पट्टा
आबालवृद्ध = बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण
आंतरराष्ट्रीय = राष्ट्राराष्ट्रांमधील
आजन्म = जिवंत असेपर्यंत
आमरण = मरण येईपर्यंत
आश्रित = इतरांच्या आधारावर जगणारा
उर्वरित = शिल्लक राहिलेले
उपकृत = ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा
उत्तरायण = सूर्याचे उत्तरेकडे सरकणे.
उधळ्या = सतत पैसा खर्च करणारा
उपऱ्या = घरदार नसलेला
उद्यमशील = सतत उद्योगशील असणारा
उःशाप = शापापासून सुटका
उदयोन्मुख = उदयाला येत असलेला
उभयचर = जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा
उपळी = जमिनीतून पाझरून निघणारा झरा
एकलकोंडा = सतत एकटे राहण्याची आवड असलेला.
ऐतोबा = श्रम न करता खाणारा
कवयित्री = कवितेची रचना करणारी
कर्तव्यपराधमुख = कर्तव्याकडे पाठ फिरविणारा
कलावान = एखादी कला अंगी असणारा
कल्पवृक्ष = इच्छिलेली वस्तू देणारे झाड
कळवळणे = असहायपणे विनंती करणे.
कृतघ्न = केलेले उपकार न जाणारा
कर्णमधुर = ऐकण्यास गोड लागणारे
कथेकरी = कथा सांगणारा
कपोतवृत्ती = कबुतराप्रमाणे अत्र संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करणे.
कृतज्ञ = केलेले उपकार जाणणारा
कष्टकरी = कष्ट करून जगणारे
कामधेनू = इच्छिलेली वस्तू देणारी गाय
कार्यक्षम = कार्य करण्यास सक्षम असलेला
काठवत = भाकरी करण्याची लाकडी परात
कुंभार = मडकी बनविणारा
कर्तव्यतत्पर = आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा
कामचुकार = कामाची टाळाटाळ करणारा
कुंजविहारी = कुंजात विहार करणारा
क्रांती = अकस्मात घडून आलेला बदल
उत्क्रांती = हळूहळू घडून येणारा बदल
खग = आकाशात गमन करणारा
खर्चीक = सतत पैसे खर्च करणारा
खट्याळ = नेहमी खोडी काढणारा
खेळगडी = आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा
गजगामिनी = जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी
गावकूस = गावाभोवतालचा तट
गडकरी = गडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी
गर्भश्रीमंत = जन्मतःच श्रीमंत असलेला
गाभारा = मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग
गारुडी = सापांचा खेळ करणारा
गुप्तहेर = गुप्त बातम्या काढणारा
गावगाडा = गावाचा कारभार
गुणग्राहक = गुणांची कदर करणारा
गिरिजन = डोंगरात वास्तव्य करणारे लोक
घाला = अचानक आलेले संकट
घरभेदी = शत्रूला सामील झालेला
घोष = नावाचा एकसारखा उच्चार
घोकंपट्टी = मोठ्याने केलेले पाठांतर
चिरंजीवी = चिरकाल जगणारा
महाडखोर = चहाडया सांगणारा
चावडी = गावच्या कामकाजाची जागा
चतुष्पाद = चार पाय असणारे
चाकोरी = गाडीच्या चाकांनी पडलेली वाट
चित्रगुप्त = मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणास यमाचा सेवक
चक्रपाणि = ज्याच्या हाती चक्र आहे असा (विष्णु)
चक्रव्यूह = चंद्रमुखी चंद्राप्रमाणे मुख असणारी
चतुर्वेदी = चार वेदांमध्ये पारंगत असणारा
चव्हाटा = चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
चांदणे = चंद्रापासून येणारा प्रकाश
जगज्जेता = जग जिंकणारा
जलचर = पाण्यात राहणारे
जन्मभूमी = जेथे जन्म झाला ती भूमी
जयघोष = नावाचा एकसारखा उच्चार
जिज्ञासू = जाणून घेण्याची इच्छा असणारा
जिवलग = जिवाला जीव देणारा
कर = कमकुवत झालेला
जगन्नियंता = जगाचे नियंत्रण करणारा
झड = सतत कोसळणारा पाऊस
टवाळखोर = रिकामा हिंडणारा
नाणी = तयार करण्याचा कारखाना
तहनामा = तहांच्या अटींचा तर्जुमा
तट = किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत
तगाई = शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज.
तिठा = तीन रस्ते एकवटतात ती जागा
तोंडपुजेपणा = तोंडावर स्तुती करण्याचा गुण
तोळा = मासा अतिशय नाजुक
दंतकथा = तोंडातोडी चालत आलेली गोष्ट
द्विकल्प = तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
दीपस्तंभ = जहाजांना दिशा दाखविणारा मनोन्यावरील दिवा
दिवाभीत = दिवसाला भिणारे
द्विज = दोन वेळा जन्मलेला
द्विज = ब्राह्मण, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात.
दुथडी = दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी
दैववादी = नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
दरवेशी = अस्वलाचा खेळ करणारा
दानशूर = खूप दान-धर्म करणारा
दुआब = दोन नद्यांमधील जागा
दैनिक = दररोज प्रसिद्ध होणारे
दुराग्रही = चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा
दीर्घायू = भरपूर आयुष्य असणारा
देशान्तर = एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे
दीर = पतीचा भाऊ
दिगंतर = सर्व दिशांना पांगलेले
दिवटी = कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा.
द्रष्टा = साक्षात्कार झालेला.
दरिद्री नारायण = अतिशय गरीब व्यक्ती
धर्मान्तर = एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे.
ध्येय = जे साध्य करावयाचे आहे ते
धर्मशाळा = यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
धबधबा = उंचावरून कोसळणारा पाणलोट
धनवान = भरपूर संपत्ती असणारा
धारवाडी = काटा बिनचूक वजनाचा काटा
धर्मांध = केवळ धर्मभेद करणारा
निर्वासित = घरादारास व देशास पारखा झालेला
निपुत्रिक = अपत्य नसणारा
निशाचर = रात्री फिरणारा
नवज्वर = नऊ दिवस टिकणारा ताप
न्यायनिष्ठूर = न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा.
नखशिखान्त = पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत
नादिष्ट = एकाच गोष्टीचा नाद करणारा
निष्पक्षपाती = कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
निरपेक्ष = कसलीही अपेक्षा नसणारा
निष्कलंक = चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा
निराधार = कुणाचाही आधार नसणारा
नभचर = आकाशात वावरणारे
निरक्षर = लिहिता वाचता न येणारा
नौकाविहार = नावेतून करावयाची क्रीडा
नवमतवादी = नवीन मतांचा पुरस्कार करणारा
नियतकालिक = ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे
निर्भय = कशाचीही भीती नसणारा
नट = नाटकात भूमिका करणारा पुरुष
निराकार = ज्याला आकार नाही असा
नंदादीप = देवापुढे सतत जळणारा दिवा
नांदी = नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत
परोपजीवी = दुसऱ्याच्या जिवावर जगणारा
परावलंबी = दुसऱ्यावर अवलंबून असणारा
परस्परावलंबी = एकमेकांवर अवलंबून असणारे
पक्ष = (पंधरवडा) पंधरा दिवसांचा काळ
पंच = तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक
पंचांग = तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका
प्रलयकाळ = जगाचा नाश होण्याची वेळ
पाणपोई = फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय
पाऊलवाट = फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट
पागा = किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा
परिचारिका = आजारी लोकांची शुश्रूषा करणारी
पाक्षिक = पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
पाश्चिमात्य = युरोप, अमेरिका या पश्चिमेकडील देशांतील लोक
पारदर्शक = ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू
पाणंदी = समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील वाट
पाणबुडी = पाण्याखालून चालणारी बोट
पाणवठा = गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा
पांजरपोळ = म्हाताऱ्या व लंगड्याळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण
पुढारी = लोकांचे पुढारीपण करणारा
पोरका = आईवडील नसलेला
पुराणमतवादी = जुन्या मतांना चिकटून राहणारा
पेय = पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ
पूरग्रस्त = पुरांमुळे नुकसान झालेले लोक
परिसर = भोवतालचा प्रदेश
परदेशगमन = दुसऱ्या देशात जाणे
पंचवटी = पाच वडांचा समुदाय असलेली जागा
पंकज = विखलात उगवलेले कमळ
पूर्वाभिमुख = पूर्वेकडे तोंड करून असलेला
पोपटपंची = अर्थ न समजता केलेले पाठांतर
पोरकट = पोरबुद्धीने वागणारा
प्रदर्शन = पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा
प्रजासत्ताक = लोकांच्या मदतीने चाललेले राज्य
पुनर्वसन = विस्थापितांना पुन्हा
प्रेक्षक = पाहण्यास जमलेले लोक
प्रक्षिप्त = प्रथात मागाहून घातलेला मजकूर
पाथरवट = इमारतीचा दगड घडविणारा
पाथगी = पिकांच्या दोन ओळीतील अंतर
पूर्वपक्ष = वादविवाद प्रथम मांडलेली भूमिका
फितूर = शत्रूला सामील झालेला
बखळ = पडक्या घराची मोकळी जागा
बहुश्रुत = ज्याला खूप माहिती आहे असा
बेट = चारही बाजूंनी पाणी असलेला देश
बारभाई = बारा जणांचा कारभार
बिनबोभाट = कोणालाही कळू न देता
बोगदा = डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता
बुद्धिजीवी = ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक
बेवारसी = वारस नसलेला
बुद्धिप्रामाण्यवादी = बुद्धीप्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा
बिनतक्रार = कोणतीही तक्रार न करता
विनातक्रार = कोणतीही तक्रार न करता
बाजारबुणगे = फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे.
बहुरूपी = विविध सोंगे घेणारा
बातमीदार = वर्तमान बातमी देणारा
भाकडकथा = निरर्थक गोष्टी किंवा गप्पा
भांडकुदळ = भांडण उकरून काढणारा
भाट = राजाची स्तुती करणारा
भूचर = जमिनीवर राहणारा
मदारी = माकडांचा खेळ करणारा
मचाण = शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा
महत्त्वाकांक्षी = विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा
माचा = पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव
मनकवडा = दुसऱ्याच्या मनातील जाणणारा
म्हातारचळ = म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार
मासिक = दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक
माहेर = लग्न झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचे घर
मितभाषी = मोजकेच बोलणारा
मिताहारी = मोजकाच आहार घेणारा
मितव्ययी = काटकसरीने खर्च करणारा
मीनाक्षी = माशासारखे डोळे असणारी
मूर्तिपूजक = मुर्तीची पूजा करणारा
मुद्देसूद = मुद्याला धरून असलेले
मृगनयना = हरिणीसारखे डोळे असणारी स्त्री
मिश्रविवाह = भित्र जातीतील वधू-वरांचे लग्न
मृत्युंजय = मृत्यूवर विजय मिळविणारा
मनसोक्त = मन मानेल तितके
मर्त्य = जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे
मनमिळाऊ = सर्वांशी मिळून मिसळून वागणारा
मदिराक्षी = जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी
मनमौजी = स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे
मशालजी = मशाल धरणारा नोकर
मार्गदर्शक = इतरांना मार्ग दाखविणारा
मारेकरी = दुसऱ्याला ठार मारण्याकरिता
माथाडी = डोक्यावरून ओझे वाहून नेणारा
मूर्तिभंजक = मुर्तीचा नाश करणारा
गिंधा = उपकाराखाली ओशाळा बनलेला
माजघर = घरातील मधले दालन
मूर्खशिरोमणी = अतिशय मूर्खपणा करणारा
युगपुरुष = समाजातील परिस्थितीला बदलून, तिला योग्य वळण लावणारा
यथाशक्ती = शक्य असेल त्याप्रमाणे
यादवी = आपापसातील कलह
युतुत्सु = लढण्याची इच्छा असणारा
यज्ञसूकर = यज्ञ करण्याची ठराविक जागा
राजनर्तिका = राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री
रामबाण = अचूक गुणकारी असे
रणवीर = युद्धात शौर्य दाखवणारा
रणशूर = युद्धात शौर्य दाखवणारा
रामप्रहर = सूर्योदयापूर्वीचा काळ
पहाट = सूर्योदयापूर्वीचा काळ
लोकप्रिय = लोकांना आवडणारे
लोकशाही = लोकांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती
लेणे = डोंगरात कोरलेले मंदिर
लोकसभा = केंद्रीय कायदेमंडळातील सभाध्यक्षांचे पदनाम
लेखनशैली = लिहिण्याची हातोटी
लोकोत्तर = सामान्य लोकांत अपवादाने आढळणारा सज्जन
लोहार = लोखंडाच्या वस्तू बनविणारा
वक्ता = सभेत भाषण करणारा -
वक्तृत्वकला = भाषण करण्याची कला
वरमाय = नवऱ्या मुलाची आई
वाटाड्या = वाट दाखवणारा
वरबाप = नवऱ्या मुलाचा बाप
विघ्नहर्ता = संकटांचे निवारण करणारा
विलाधिका = शोकाचे वर्णन करणारी कविता
वामकुक्षी = दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा
वनवासी = वनात राहणारे लोक
विडंबन = दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका
वार्षिक = वर्षांने प्रसिद्ध होणारे
विनावेतन = पगार न घेता काम करणे
विधवा = जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री
वात्सल्य = आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम
वाचनालय = सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय
वेशांतर = वेश बदलणे
व्याख्याता = व्याख्यान देणारा
वासा = घराच्या छताला आधार देणारे लाकूड
वखार = धान्य साठविण्याची बंदिस्त जागा
वचन बद्धता = एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी
वानरकिवण = अपायकारक सहानुभूती
वडिलोपार्जित = वाडवडिलांपासून मिळालेले.
वर्णनशैली = वर्णन करण्याची हातोटी
विधुर = ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष
वैष्णव = भगवान विष्णूची उपासना करणारा
वल्कले = झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र
व्यभिचारिणी = व्यभिचारी स्त्री
विकीपीडिया = संगणकीय महाजाल जगनातील ज्ञानकोश
व्यवहारशून्य = व्यवहाराचे ज्ञान नसलेला
विकल्प = शंका, संभ्रम, पर्याय
वैधानिक = कायद्याने प्रस्थापित होणारे
वाटाघाटी = मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
व्यवहारज्ञानी = व्यवहारात चतुर
वेस = गावाचे प्रवेशद्वार
शतायुषी = शंभर वर्षे आयुष्य असणारा
शिलालेख = दगडावर कोरलेले लेख
शेजारधर्म = शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य
शतपावली = जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ
शाश्वत = कधीही नष्ट न होणारे
शीघ्रकोपी = अतिशय लवकर रागावणारा
शाखाचक्रमण = उडत उडत केलेले वाचन
श्रद्धाळू = श्रद्धा ठेवून वागणारा
श्रोता = दुसऱ्याचे भाषण ऐकणारे
सत्याग्रह = अन्यायनिवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे
सत्याग्रही = सत्यासाठी झगडणारे
सनातनी = जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा
संगम = दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण
शरणागत = शरण आलेला
शाप = एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा
शिल्प = दगडावर केलेले कोरीव काम
शुक्लपक्ष = चांदणे असलेला पंधरवडा
शैव = भगवान शंकरांची उपासना करणारा
शिक्केनवीस = राजाचा शिक्का सांभाळणारा
शुभ = पवित्र शिव मंगळ
श्रमजीवी = श्रम करून जीवन जगणारे
तत्त्व = सूत्र मोजक्या शब्दांत सांगितलेले
सभाधीट = सभेत धीटपणे भाषण करणारा
समकालीन = एकाच काळातील
संस्थापक = एखाद्या संस्थेची स्थापना करणारा
सुवासिनी = जिचा पती जिवंत आहे अशी
स्वकष्टार्जित = स्वतःश्रम करून मिळविलेले
स्मारक = मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू
स्वगत = स्वतःशी केलेले भाषण
स्वच्छंदी = स्वतःच्या इच्छेने वागणारा
स्वदेशी = आपल्याच देशात तयार होणारे
स्वयंसेवक = आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा
स्वार्थत्यागी = स्वतःच्या हिताचा त्याग करणारा
स्वार्थपरायण = स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा
स्वाभिमानशून्य = स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा
स्वामिनिष्ठ = धन्याशी निष्ठेने वागणारा
स्वावलंबी = स्वतःचे काम स्वतःच करणारा
साप्ताहिक = आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
साम्यवादी = सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा
साक्षर = लिहिणे, वाचणे येत असलेला
सुविचार = चांगला विचार
सुसाध्य = सहज साध्य होऊ शकणारे
सुस्कारा = दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास
स्थितप्रज्ञ = कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते,
सहोदर = एकाच आईच्या पोटी जन्मलेले.
सोयरीक = विवाहबंधनामुळे दोन कुटुंबांत निर्माण झालेले नातेसंबंध
सहगमन = पती निधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदहन
संगनमत = अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट
सांगकाम्या = सांगितलेले तेवढेच करणारा
सामंतशाही = सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे शासन
हुतात्मा = देशासाठी/समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा
हृदयद्रावक = अंतःकरणाला पाझर फोडणारे
हृदयस्पर्शी = हृदयाला जाऊन भिडणारे
हेर = शत्रूकडील बातमी काढून आणणारा
हतभागी = ज्याचे / जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा / अशी
होयबा = सर्व गोष्टींना होकार देणारा
क्षितिज = जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण
क्षणभंगुर = क्षणात नष्ट होणारे
त्रैमासिक = तीन महिन्यांतून प्रसिद्ध होणारे नियतकालिक
त्रिशंकू = धड ना इकडे, धड ना तिकडे
त्राटिका = अतिशय भांडखोर स्वी
यादवी = आपापसातील कलह
हे पण वाचा :- क्रियापद व त्याचे प्रकार
            आम्ही तुम्हाला येथे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय?  शब्दसमूहाबद्दल एक शब्दची उदाहरण , शब्दसमूहाबद्दल एक शब्दची यादी ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi |  Marathi Tenses ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
 

 
 
 
 
 
 
 
 
 The Study Katta Team
The Study Katta Team
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box