शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे | Documents required for government certificate - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 4, 2023

शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे | Documents required for government certificate

शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे

Documents required for government certificate 

शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे |  Documents required for government certificate


शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे ( Documents required for government certificate ) :-

            आपल्याला दैनंदिन जीवनात शासकीय कामांसाठी नेहमी कोणत्यानकोणत्या दाखल्यांची आवश्यकता असते. शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेणे असो किंवा नोकरीचा फॉर्म भरणे असो अथवा एखादी शासकीय योजना मिळवणे असो अशा सर्वच कामांसाठी शासकीय दाखल्यांची (Government Certificate) गरज भासते. परंतु हे दाखले मिलाव्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्रे लाग्रतात याची माहिती आपल्याला नसते मग आपली खूप ओढाताण होत असते. त्यासाठी आपला त्रास कमी व्हावा यासाठी अगोदरच सर्व कागदपत्रे जमा असतील तर आपला वेळ, पैसा वाचतो तसेच सर्वात महत्वाच म्हणजे त्रास कमी होतो. चला तर मग बघूया कोणत्या शासकीय दाखल्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात.

उत्पन्न दाखला 

( Income certificate )

क्र.कागदपत्रे / दाखले
तलाठी उत्पन्न दाखला
नोकरी असल्यास फॉर्म नं. १६
शेती असल्यास ७/१२ व ८ अ
पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स
आधारकार्ड झेरॉक्स

रेशन कार्ड झेरॉक्स
फोटो



आधारकार्ड काढण्यासाठी

( Aadhar Card)

क्र.कागदपत्रे / दाखले
ओळखीचा पुरावा 
पत्त्याचा पुरावा
जन्मतारीख पुरावा
संबंध कागदपत्रांचा पुरावा



चालक परवाना

( Driving License)

क्र.कागदपत्रे / दाखले
ओळखीचा पुरावा 
पत्त्याचा पुरावा
जन्मतारीख पुरावा
पासपोर्ट आकाराची फोटो

४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
संबंध कागदपत्रांचा पुरावा



डोमेसाईल | नॅशनलिटी दाखला

( Domicile | Nationality certificate)

क्र.कागदपत्रे / दाखले
शाळा सोडल्याचा दाखला
रहिवाशी दाखला
रेशनकार्ड झेरॉक्स
आधारकार्ड झेरॉक्स
फोटो 



नॉन क्रिमिलेअर दाखला

( Non-Criminal certificate)

क्र.कागदपत्रे / दाखले
तहसिलदार उत्पन्न दाखला ( ३ वर्षाच्या उत्पन्नासहित )
जातीच्या दाखल्याची झेरॉक्स
शाळा सोडल्याच दाखला
मुलाच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल
नोकरी असल्यास फॉर्म नं. १६

रेशन कार्ड झेरॉक्स
आधारकार्ड झेरॉक्स
फोटो 



जातीचा दाखला

( Caste certificate )

क्र.कागदपत्रे / दाखले
शाळा सोडल्याचा दाखला
मुलांच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल
वडिलांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स
आधारकार्ड झेरॉक्स
रेशनकार्ड झेरॉक्स

फोटो
ओ बी सी साठी १९६७ पूर्वीचा पुरावा
एन. टी साठी १९६१ पूर्वीचा पुरावा
एस. सी साठी १९५० पूर्वीचा पुरावा



जात पडताळणी दाखला

( Caste validity certificate )

क्र.कागदपत्रे / दाखले
प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला
कॉलेज सोडल्याचा दाखला
प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा

जन्म - मृत्यू नोंदवहीचा उतारा
जमिनीचा ७/१२ उतारा
कोतवाल नोंदवहीचा उतारा
राष्ट्रीयत्वाचा नोंदवहीचा उतारा
१०सेल डिड /महसूल विभागाकडील कागदपत्रे
११नाव - आडनाव बदल राजपत्र
१२जातीचे प्रमाणपत्र
१३सेवा वैधता प्रमाणपत्र
१४वारसा हक्क प्रमाणपत्र
१५जातीचे वैधता प्रमाणपत्र


रेशनकार्ड मध्ये नाव वाढवणे

( Entering name in ration card )

क्र.कागदपत्रे / दाखले
आधारकार्ड झेरॉक्स
रेशनकार्ड मुळ प्रत
मुल ६ महिन्याच्या आतील असेल असेल तर जन्म दाखला
लग्न झाले असेल तर माहेरच्या रेशनकार्ड मधून नाव कमी केल्याची पावती



रेशनकार्ड मधुन नाव कमी करणे

( Reduction of name from ration card )

क्र.कागदपत्रे / दाखले
मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे संमतीपत्र
आधारकार्ड झेरॉक्स
रेशनकार्ड मुळ प्रत
फोटो 



विभक्त कौटुंबिक प्रमाणपत्र

( Family Separation Certificate )

क्र.कागदपत्रे / दाखले
पॅन कार्ड
पासपोर्ट
आर एस बी वाय कार्ड
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र

नरेगा जॉब कार्ड
ड्रायविंग चा परवाना
अर्ध सरकारी आयकार्ड
पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक) 



निवासी प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा

( Residential Certificate Address Proof )

क्र.कागदपत्रे / दाखले
आधारकार्ड
रेशनकार्ड
मालमत्ता कर
निवडणूक कार्ड
भाडे करार

वीज बिल

( वरील पैकी कोणतेही एक )


विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरीकांसाठी पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र

(Police Clearance Certificate)

क्र.कागदपत्रे / दाखले
वर्तमान पासपोर्ट कॉपी
सध्याच्या जे-१ व्हिसाची प्रत ( स्वतःशी संलग्न )
नोटरीकडून शपथपत्र ( साक्षांकित व नोटराईज्ड )
डिप्लोमा प्रमाणपत्र कॉपी ( स्वतःची साक्षांकित )
महाराष्ट्राचे डोमेसाईल प्रमाणपत्र प्रत ( स्वतःची साक्षांकित )

फॉर्म डीएस - २०१९ ची प्रत
जे - १ पात्रता प्रमाणपत्र 


          तुम्हाला शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे |  Documents required for government certificate ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad