'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी | Marathi Bhasha Gaurav Din | V.V. Shirwadkar Jayanti - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 5, 2023

'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी | Marathi Bhasha Gaurav Din | V.V. Shirwadkar Jayanti

'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी

वि.वा.शिरवाडकर जन्मदिन

Marathi Bhasha Gaurav Din

'Marathi Language Pride Day'

V.V. Shirwadkar Jayanti

'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी | Marathi Bhasha Gaurav Din | V.V. Shirwadkar Jayanti

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी |
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी |
एवढ्या जगात माय मानतो मराठी |


माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा

वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म :-

          ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कविवर्य वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक यथे झाला. यामुळे आपण वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करतो.


वि.वा.शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज नाव का ठेवले ?

          विष्णू वामन शिरवाडकर यांच्या लहान बहिणीचे नाव कुसुम होते. कुसुम ही शिरवाडकरांची फार लाडकी होती. शिरवाडकरांना कविता लेखनाची फार आवड होती. त्यांनी कविता लेखन करण्यासाठी त्यांचे टोपणनाव तिच्या नावावरून कुसुमचा अग्रज म्हणजेच कुसुमचा मोठा भाऊ याअर्थाने कुसुमाग्रज हे वापरले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील शिरवाडकरांचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले. मराठीमध्ये कविता तसेच मराठी भाषेला साहित्यात विशेष असे स्थान मिळून देण्यात शिरवाडकरांचा सिंहाचा वाटा आहे. 

हे पण पहा :- समानार्थी शब्द

'मराठी भाषा गौरव दिन' :-

          मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव व्हावा तसेच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला होता. तसेच २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. 'मराठी भाषा गौरव दिन' महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो.


वि.वा.शिरवाडकर यांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार :-

 • १९६० :- ’मराठी माती’
 • १९६२ :- 'स्वगत’
 • १९६२ :- ’हिमरेषा’ला
 • १९७१ :- ’नटसम्राट’
 • १९७४ :- ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार
 • १९६६ :- "ययाती आणि देवयानी" या नाटकास
 • १९६७ :- "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास
 • १९९१ :- भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार
 • १९६५ :- अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार
 • १९७४ :- 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
 • १९८६ :- पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
 • १९८८ :- संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
 • विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
 • भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
 •  अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.

हे पण पहा :- आलंकारिक शब्द

वि.वा.शिरवाडकर यांनी लिहिलेले साहित्य :-

कविता संग्रह

 • १९९० :- अक्षरबाग
 • १९५२ :- किनारा
 • १९९८ :- चाफा
 • १९८२ :- छंदोमयी
 • १९३६ :- जाईचा कुंज
 • १९३३ :- जीवन लहरी
 • २००२ :- थांब सहेली
 • १९८९ :- पांथेय
 • १९८९ :- प्रवासी पक्षी
 • १९६० :- मराठी माती
 • १९९७ :- महावृक्ष
 • १९९४ :- माधवी
 • १९९९ :- मारवा
 • १९८४ :- मुक्तायन
 • १९५६ :- मेघदूत
 • १९६९ :- रसयात्रा
 • १९६९ :- वादळ वेल
 • १९४२ :- विशाखा
 • १९८५ :- श्रावण
 • १९४७ :- समिधा
 • १९६२ :- स्वगत
 • १९६४ :- हिमरेषा


निबंध संग्रह

 • आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
 • प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह


नाटके

 • ऑथेल्लो
 • आनंद
 • आमचं नाव बाबुराव
 • एक होती वाघीण
 • किमयागार
 • कैकेयी
 • कौंतेय
 • जेथे चंद्र उगवत नाही
 • दिवाणी दावा
 • दुसरा पेशवा
 • दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड)
 • देवाचे घर
 • नटसम्राट
 • नाटक बसते आहे
 • बेकेट
 • महंत
 • मुख्यमंत्री
 • ययाति देवयानी
 • राजमुकुट
 • विदूषक
 • वीज म्हणाली धरतीला
 • वैजयंती

हे पण वाचा :- भारतीय संविधान

कथासंग्रह

 • अंतराळ (कथासंग्रह)
 • अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
 • एकाकी तारा
 • काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
 • जादूची होडी (बालकथा)
 • प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
 • फुलवाली (कथासंग्रह)
 • बारा निवडक कथा (कथासंग्रह)
 • सतारीचे बोल (कथासंग्रह)

कादंबऱ्या

 • कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
 • जान्हवी (कादंबरी)
 • वैष्णव (कादंबरी)
 • आठवणीपरसंपादन करा
 • वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)

हे पण पहा :- मराठी बोधकथा

एकांकिका

 • दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.
 • देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३.
 • नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६.
 • प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
 • बेत, दीपावली, १९७०.
 • संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.


लघुनिबंध आणि इतर लेखन

 • आहे आणि नाही
 • एकाकी तारा
 • एखादं पण, एखादं फूल
 • प्रतिसाद
 • बरे झाले देवा
 • मराठीचिए नगरी

'अभिजात भाषा' म्हणजे काय?

          प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच 'अभिजात' भाषा.

          कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले आहेत. 

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ४ निकष आहेत. 

 1. भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५०० - २००० वर्षं जुना हवा.
 2. प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
 3. दुसर्‍या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
 4. अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

हे पण पहा :- मराठी म्हणी व त्याचे अर्थ

रंगनाथ पठारे समितीचा अहवालात :-

          मराठी भाषा ते सर्व निकष पुर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या ४३६ पानांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी २०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. २०१३ साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अहवालाच्या समारोपात समितीने म्हटलं की, अकरा कोटी लोकांची मराठी जगातली १० व्या ते १५ व्या क्रमांकाची भाषा असून देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास काय फायदा होणार?

 1. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे.
 2. मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे.
 3. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
 4. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
 5. महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालयांना सशक्त करणे.


भारतात आतपर्यांत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.

 1. २००४ :- तामिळ
 2. २००५ :- संस्कृत
 3. २००८ :- कन्नड
 4. २००८ :- तेलुगु
 5. २०१३ :- मल्याळम
 6. २०१४ :- ओडिया


मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिवस यातील फरक :-

          मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिवस या दिवसांना आपण एकच समजतो परंतु ते तसे नाही कारण भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे.


          १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला. १ मे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. 


          वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

            या लेखातून आपणाला खालील माहिती मिळण्यास मदत होईल.

 • वि.वा.शिरवाडकर जन्मदिन ( V V Shirwadkar Janmdin )
 • वि.वा.शिरवाडकर जयंती ( V V Shirwadkar Jayanti )
 • वि.वा.शिरवाडकर पुण्यतिथी ( V V Shirwadkar Punytithi )
 • वि.वा.शिरवाडकर माहिती ( V V Shirvadkar Information)
 • मराठी भाषा गौरव दिन ( Marathi Bhasha Gaurav Din | Marathi Language Pride Day )

          तुम्हाला 'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारी| Marathi Bhasha Gaurav Din | V.V. Shirwadkar Jayanti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad