१३ फेब्रुवारी दिनविशेष | 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 12, 2024

१३ फेब्रुवारी दिनविशेष | 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi

१३ फेब्रुवारी दिनविशेष

13 February Dinvishesh

13 February day special in Marathi

१३ फेब्रुवारी दिनविशेष | 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi

            १३ फेब्रुवारी दिनविशेष ( 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ फेब्रुवारी दिनविशेष ( 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ फेब्रुवारी दिनविशेष

13 February Dinvishesh

13 February day special in Marathi


@ जागतिक रेडिओ दिवस [ World Radio Day ]

[१६३०]=> आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

[१६६८]=> स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

[१७३९]=> कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

[१७६६]=> प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म.

[१८३५]=> अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म.

[१८७९]=> प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म.

[१८८३]=> जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन.

[१८९४]=> इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म.

[१९०१]=> गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.

[१९१०]=> वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म.

[१९११]=> लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म.

[१९४५]=> अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म.

[१९६०]=> फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

[१९६८]=> संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

[१९७४]=> इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन.

[१९८४]=> युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

[१९८८]=> कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

[२००३]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

[२००८]=> हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

[२०१०]=> पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

[२०१२]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन.

Read Also :- One Word Substitution

            तुम्हाला १३ फेब्रुवारी दिनविशेष | 13 February Dinvishesh | 13 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad