१३ एप्रिल दिनविशेष | 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 12, 2024

१३ एप्रिल दिनविशेष | 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi

१३ एप्रिल दिनविशेष

13 April Dinvishesh

13 April day special in Marathi

Today day special Marathi

१३ एप्रिल दिनविशेष | 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi

            १३ एप्रिल दिनविशेष ( 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ एप्रिल दिनविशेष ( 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ एप्रिल दिनविशेष

13 April Dinvishesh

13 April day special in Marathi


@ जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन [Jallianwala Bagh Massacre Remembrance Day]

[१६९९]=> गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

[१७३१]=> छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

[१७४३]=> अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म.

[१८४९]=> हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

[१८९५]=> भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म.

[१९०५]=> इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.

[१९०६]=> आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.

[१९१९]=> जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

[१९२२]=> टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म.

[१९४०]=> राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.

[१९४२]=> व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

[१९५१]=> औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन.

[१९५६]=> अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.

[१९६०]=> अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

[१९६३]=> रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

[१९७३]=> अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन.

[१९७३]=> भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन.

[१९८८]=> महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

[१९९७]=> मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

[१९९९]=> कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

[२०००]=> चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

[२००८]=> संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन.


            तुम्हाला १३ एप्रिल दिनविशेष | 13 April Dinvishesh | 13 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad