मराठी बोधकथा - उंदीर आणि डोंगर
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी एक उंदीर रहात होता. डोंगर उंदराला रोज इकडे तिकडे पळताना पहात असे. एक दिवस उंदीर त्याच्या बिळातून बाहेर येताच डोंगर म्हणाला, "अरे क्षुद्र प्राण्या! किती लहान आहेस तू." उंदीर म्हणाला, "माझ्या आकाराशी तुला काय करायचे आहे?" डोंगर म्हणाला, " मी बघ केवढा मोठा आहे. माझ्या समोर वारा व ढग गुढगे टेकतात. मोठ्यांचा फायदा मोठ असतो."
लहान उंदीर नम्रपणे म्हणाला, "मला मान्य आहे की तू मोठा आहेस. पण तू मला तुझ्या पायाजवळ बिळ पाडण्यापासून थांबवू शकतोस का? डोंगराला स्वतःची लाज वाटली.
बोध :- लहान गोष्टींची किंमत मोठी असते.
तुम्हाला मराठी बोधकथा - उंदीर आणि डोंगर | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box