अभ्यास करताना घ्यावयाची काळजी | Care to be taken while studying - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

अभ्यास करताना घ्यावयाची काळजी | Care to be taken while studying

Care to be taken while studying

अभ्यास करताना घ्यावयाची काळजी

अभ्यास करताना घ्यावयाची काळजी ( Care to be taken while studying ) हा एक फार महत्वाचा व गरजेचा विषय आहे. अभ्यास करतांना जागा, शांतता, प्रकाश, वातावरण व इतर अनेक गोष्टी असतात या सर्व गोष्टींमुळे आपल्या आभ्यासावर अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही प्रकारे परिणाम होतात ते आज आपण येथे पाहणार आहोत. तर चला मग बघूया अभ्यास करताना घ्यावयाची काळजी ( Care to be taken while studying )

अभ्यास करताना घ्यावयाची काळजी | Care to be taken while studying

[१] अभ्यास करण्यासाठी नेहमी चांगला प्रकाश असलेल्या जागेवरच बसावे. प्रकाश कमी नको त्यामुळे डोळ्यावर ताण पडतो किंवा जास्त ही नको त्यामुळे डोळ्याला त्रास होईल.

[२] लाईट असेल तर त्याचा प्रकाश आपल्या पाठीमागून अथवा वरतून असावा समोरून नसावा जेणेकरून उजेड आपल्या डोळ्यावर न पडता पुस्तकाच्या पानावर पडेल.


[३] अभ्यासाची खोली स्वच्छ व नीटनेटके असली पाहिजे तेथे कचरा व अस्तव्यस्त असे कपडे किंवा सामान पडलेले नसावे.


[४] अभ्यासाच्या खोलीत एखादी सुगंदी अगरबत्ती किंवा रूमफ्रेशनर मारले तर त्या सुगंधाने मन प्रसन्न राहते.

[५] अभ्यासाच्या खोलीत हवा मोकळी व खेळती असायला हवी जेणे करून आपले मन तेथे रमते व आपल्याला कोंदटपणा वाटत नाही.

[६] अभ्यासाला बसण्याअगोदरच आपले सगळे साहित्य जवळ घेऊन बसावे जेणेकरून सारखे उठून जावे लागणार नाही.

[७] अभ्यास करत असतांना शांत जागा पाहूनच बसावे जेणेकरून आपले मन अभ्यासत एकाग्रतेने होते.

[८] अभ्यास करत असतांना टेलीव्हिजन, रेडीओ या सारख्या मन विचलित करणाऱ्या वस्तू बंद कराव्यात तर मोबाईल बंद अथवा साईलेंट करून आपल्यापासून दूर ठेवावा जेणेकरून आपले लक्ष सारखे त्याकडे जाणार नाही.

[९] वाचन करायला बसतांना नेहमी खुर्ची टेबल वर बसण्याचा प्रयत्न करावा. पुस्तक कधीही झोपून वाचू नये. त्यामुळे वाचालेले आपल्या लक्षात तर राहत नाहीच पण आपल्याला झोप येते.


[१०] वाचन करतेवेळी लिहिण्याची सवय लावावी म्हणजे वाचनात एकाग्रता राहते व आपल्या नोट्स देखील तयार होतात. ह्याच नोट्स भविष्यात तुम्हाला परीक्षा देण्यासाठी उपयोगी पडतील.

[११] कोणतेही पुस्तक किमान तीन वेळा तरी वाचायला हवे ते वाचन दीर्घकाळ लक्षात राहते व त्यामधील अर्थ आपल्याला व्यवस्थित समजतो.

[१२] कोणतेही पुस्तक वाचतांना फक्त वाचन म्हणून न वाचत त्यामागील अर्थ समजून वाचन केल्यास ते वाचन चांगले व दीर्घकाळ लक्षात राहते.

[१३] वाचन करतांना पाठांतराकडे लक्ष न देता त्यामागील अर्थ समजून वाचन करावे व त्यावर विचार विमर्श करावा.

हे पण वाचा :- मराठी बोधकथा

[१४] तुम्ही केलेल्या वाचनावर इतरांशी चर्चा नक्कीच करावी त्यामुळे तुमचे वाचन केलेल्या भागावर सरावही (Revision)  होतो व काही चुकले असेल तर पुढील व्यक्ती ती चूक आपल्या लक्ष्यात आणून देते त्यामुळे आपल्याला त्यात दुरुस्ती करता येते.

[१५] अभ्यास करतांना जुन्या प्रश्नपत्रिका पहाव्यात व त्यावरून आपल्याला कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारतात व किती गुणांसाठी विचारतात याचा अंदाज येतो. त्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यास सोपे जाते.

[१६] अभ्यास करण्यासाठी अधिक काठीण्य पातळी (More difficulty level) असलेले तसेच लवकर न समजणारे घटक आपण संगणक किंवा मोबाईल यांच्या इंटरनेट वर गूगल ( Google ) किंवा युटूब  ( YouTube ) वर माहिती शोधून आपल्याला मदत घेता येईल. परंतु जास्त वेळ त्याला देऊ नये.

[१७] अभ्यास करतांना चित्रे ( Pictures ), नकाशे ( Maps), चार्ट ( Chart ), प्रतिकृती ( Replica ), अश्या गोष्टींची मदत घेतल्यास केलेला अभ्यास लवकर समजतो व अधिक काळ लक्ष्यात राहतो.

[१८] अभ्यास करतांना पहिल्या दिवशी एकदम ४ ते ५ तास बसू नये अगोदर एक किंवा दोन तासच बसावे नंतर आपळी वेळ हळूहळू वाढवावी.

[१९] अभ्याला जास्त वेळ न बसता दर एक ते दोन तासाने ५ मिनिटाची विश्रांती घ्यावी किंवा एखादी चक्कर मारून यावी म्हणजे आळस निघून जातो.

[२०] जे विद्यार्थी दिवसाला ४ ते ५ तास किवां अधिक काळ अभ्यासाला बसतात त्यांनी अभ्यासाला बसताना पाणी जवळ घेऊन बसू नये जेणेकरून दर एक ते दोन तासाला पाणी पिण्याच्या निमीत्ताने का होईना तुमची हालचाल होईल. त्यामुळे तुमचा आळसही जाईल व एका जागी बसून तुम्हाला मान, पाठ, कंबर तसेच डोळे यांचे निर्माण होणारे आजार होणार नाही.


[२१] अभ्यासाची सुरुवात नेहमी तुमच्या आवडत्या विषयाने करावी. म्हणजे अभ्यासात आवड निर्माण होते.

[२२] अभ्यासासाठी एक वेळापत्रक ( Schedule ) बनवून घ्यावे.  त्यावेळी त्या व्यतिरिक्त दुसर्या कामांचा विचार करू नये. सतत २१ दिवस असे केल्याने आपल्या त्याची सवय लागते.


[२३] बर्याचदा असे होते की खूप वाचूनही काही मुलांच्या लक्षात राहत नाही त्याला कारण त्यांचा अतिचंचल स्वभाव ( Fickle Nature ) किंवा मानसिक तान ( Mental Stress ) असतो त्यासाठी त्यांनी नको त्या गोष्टींचा विचार करणे सोडून द्यावा व किमान दररोज १० मिनिटे ध्यान ( Meditation ) करायला हवा त्यांना याचा नक्कीच फायदा होईल.

[२४] आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार (Positive Thinking) ठेवा की "मी हे करू शकतो'" नकारात्मक विचार ( Negative Thinking ) व तसे विचार करणारे व्यक्ती यांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. 

[२५] अभ्यास करायला याच वेळी करावा अस काही नसते फक्त आपण एक वेळ निश्चित करून घ्यावी जेणेकरून आपल्याला त्या वेळेची सवय लागते. बरेचदा असे म्हणतात की सकाळची वेळ  अभ्यास करण्यास चांगली असते ती फक्त यासाठी की त्यावेळी शांतात असते व आपण विश्रांती घेऊन उठ्लेलो असतो व त्यावळी वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे  तेव्हा आपला मेंदू महिती ग्रहण करण्यास पूर्णपणे तयार असतो.


[२६] अभ्यासाठी सर्वात महत्वाच आपले आरोग्य  चांगले असणे आवश्यक असते. मग ते\ मानसिक असो किंवा शारीरिक असो दोन्हीही निरोगी असायला हवे त्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम व योगासने करणे तसेच वेळेवर प्रमाणात  विश्रांती, झोप व जेवण करणे  महत्वाचे असते.

[२७] अभ्यास करण्याअगोदर आपला आहार हा प्रमाणात असावा कारण की जास्त जेवण केल्यास आपल्याला आळस व झोप येते व आपण कमी जेवण केल्यास आपल्या थकवा व अशक्तपणा येऊन डोकेदुखीची समस्या होते.

          तुम्हाला अभ्यास करताना घ्यावयाची काळजी | Care to be taken while studying | Things to remember while studying | What to be careful while studying  ही माहिती आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा तसेच काही नवीन सुचावेसे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad