INDEPENDENCE DAY
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
15 August Independence Day Essay - Speech
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण | Independence Day | 15 August Independence Day Essay - Speech :-
आपण सर्वच जाणतो की स्वातंत्र्य आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी १५० वर्ष वाट बघावी लागली. तेव्हा १५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे.
हे पण पहा :- देशभक्ति गीत
जगातील कोणत्याही देशाचा स्वातंत्र्य दिवस हा मुख्यतः त्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्यचा दिवस म्हणून ओळखला जातो. भारताचा स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून प्रत्येक वर्षी आपण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. भारताचा स्वातंत्र्य दिवस हा भारतीयांसाठी एक राष्टीय सणच असतो आणि आपण हा दिवस प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो.
आपल्यासाठी भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. कारण याच दिवशी जुलमी ब्रिटिश राजवटीतून आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. तसेच त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो. भारतामध्ये व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारत देश काबीज केला. आपले गमावलेले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाईपटेल, सुभाषचंद्र बोस अशा अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं.
हे पण पहा :- ९ ऑगस्ट - क्रांती दिन
पंडित नेहरुंनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येच्या दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष्याचा प्रवास सांगितला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवट झुगारून स्वातंत्र्य मिळवले. भारतासाठी ती एक उत्सवाची आणि आनंदाची रात्र ठरली.
१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर शाळा, कॉलेज, शासकीय तसेच खाजगी कार्यालये येथे ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.
हे पण पहा :- जागतिक आदिवासी दिन
भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. तसेच भारत देशाची राज्यघटना अर्थात संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतु भारत देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय एकत्र आहोत हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज ७४ वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. त्याला काही अपवादात्मक धार्मिक संघटना आहेतही परंतु जगात अशी कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते, त्यात थोड्याफार उणीवा असतातच. भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे परंतु त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण. परंतु कठीण असले तरी अश्यक्य नाही तेव्हा ते आपल्याला जमलेच पाहिजे तरच भारत देश एक महासत्ता म्हणून नावारूपाला येईल.
मला भारत देशासाठी एक फार सुंदर गीत आठवते.
जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का
पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि
जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है
और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर
डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा
अलबेलों की इस धरती के
त्योहार भी है अलबेले
कहीं दीवाली की जगमग है
कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का
चारो और है घेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ आसमान से बाते करते
मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर मे किसी द्वार पर
कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता
है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा ...
आपणां सर्वांना माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल.
जय हिंद, जय भारत.....
तुम्हाला १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण | Independence Day | 15 August Independence Day Speech ही माहिती आवडली असेल तर मग शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box