KRUDANTE IN MARATHI
कृदन्त - धातुसाधिते
Dhatusadhite / Krudant
          कृदन्त - धातुसाधिते | Krudante in Marathi | Dhatusadhite ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी कृदन्त - धातुसाधिते ( Krudante in Marathi | Dhatusadhite ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी कृदन्त - धातुसाधिते | Krudante in Marathi | Dhatusadhite ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.  
हे पण पहा :- अव्ययीभाव समास
धातू म्हणजे काय?
          क्रियापदामध्ये जे प्रत्ययरहित मूळ शब्द असतात त्यांना धातू ( Dhatu ) असे म्हणतात.
धातुसाधित म्हणजे काय?
          धातूपासून तयार झालेल्या शब्दांना धातुसाधित किंवा कृदन्त ( Dhatusadhit / Krudant ) असे म्हणतात.
          जेव्हा धातूला प्रत्यय लागून त्यापासून क्रियापदाची विविध रूपे तयार होतात परंतु त्या तयार झालेल्या रूपापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही किंवा ती रूपे क्रिया पूर्ण करू शकत नाही त्यांना धातुसाधित ( Dhatusadhit ) असे म्हणतात.
हे पण पहा :- तत्सम शब्द
कृदंत म्हणजे काय?
          कृदंत म्हणजे असा शब्द की ज्याच्या शेवटी फक्त क्रियादर्शक प्रत्यय आहे. धातूंना जे प्रत्यय जोडले जातात त्यांना संस्कृत मध्ये कृदंत ( Krudant ) प्रत्यय असे म्हणतात.
कृदंत उदाहरण :-
१) तो खेळताना पडला.
२) सीता गाणे गाऊ लागली.
३) सुयश क्रिकेट खेळत होता.
४) मी पुरात म्हैस बुडताना पाहीली.
५) पिंकी बाबांकडे बघून हसत आहे.
६) राम पेपर वाचताना अचानक थांबला.
७) कोल्हापुरात तिखट खाणारी माणसे भरपूर आहेत.
धातू प्रत्यय धातूसाधित खेळ ताना खेळताना खेळ त खेळत गा ऊ गाऊ बुड ताना बुडताना बघ ऊन बघून वाच ताना वाचताना खा णारी खाणारी उठ ऊन उठून कर   ता करता बस णे बसणे हस ऊन हसून रड ताना रडताना जन अक जनक मान अनिय माननीय त्याग ई त्यागी रस इक रसिक  
| धातू | प्रत्यय | धातूसाधित | 
|---|---|---|
| खेळ | ताना | खेळताना | 
| खेळ | त | खेळत | 
| गा | ऊ | गाऊ | 
| बुड | ताना | बुडताना | 
| बघ | ऊन | बघून | 
| वाच | ताना | वाचताना | 
| खा | णारी | खाणारी | 
| उठ | ऊन | उठून | 
| कर   | ता | करता | 
| बस | णे | बसणे | 
| हस | ऊन | हसून | 
| रड | ताना | रडताना | 
| जन | अक | जनक | 
| मान | अनिय | माननीय | 
| त्याग | ई | त्यागी | 
| रस | इक | रसिक | 
हे पण पहा :- अभ्यस्त शब्द
          खेळताना, खेळत, गाऊ, बुडताना, बघून, वाचताना व खाणारी ही सर्व धातूपासून तयार झालेली रुपे आहेत. परंतु तुम्ही त्यापासून वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. याकरणास्तव त्यांना आपण क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते असे म्हणतो.
            आम्ही तुम्हाला येथे धातु म्हणजे काय ?, धातुसाधित म्हणजे काय ? कृदंत म्हणजे काय ?, व त्यांची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी मराठी कृदन्त - धातुसाधित | Krudante in Marathi | Dhatusadhite ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
 

 
 
 
 
 
 
 
 
 The Study Katta Team
The Study Katta Team
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box