Yoga asanas | Yogasana poses | योगासनाचे प्रकार व त्याचे फायदे - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 3, 2023

Yoga asanas | Yogasana poses | योगासनाचे प्रकार व त्याचे फायदे

YOGA ASANAS

YOGASANA POSES

योगासन व त्याचे प्रकार व फायदे

Yoga asanas | Yogasana poses | योगासनाचे प्रकार व त्याचे फायदे

योगासन म्हणजे काय?

             YOGA ASANAS योगासन म्हणजे शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी व अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती होय.

            योग ( Yoga ) हा शब्द संस्कृत शब्द "युज" पासून आला आहे ज्याचा अर्थ सामील होणे किंवा एकत्र येणे, ज्याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे मन आणि शरीराच्या एकीकरणाने वैयक्तिक चेतना जागृत करणे.

            योगामध्ये आसन किंवा आसन आणि प्राणायाम नावाचे आकर्षक व्यायाम असतात ज्यात श्वासोच्छवासाचे व्यायाम समाविष्ट असतात. ऋग्वेद, उपनिषद आणि पतंजलीतील योगसूत्रांमध्ये योगाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे, जेणेकरून लोकांना आरोग्याचे महत्त्व समजावे आणि आरोग्याची सवय लावावी. ही जुनी प्रथा काळानुसार अधिक प्रचलित झाली आहे आणि आज ती गरज बनली आहे. व्यायामशाळेच्या ऐवजी जिथे फक्त स्नायू तयार करणे आणि तुकडे करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते, एखादी व्यक्ती योगाभ्यास करू शकते ज्याचे अधिक फायदे आहेत. 


            योगामुळे आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढते आणि त्यामुळे आपले सामाजिक कल्याणही समृद्ध होते. हे आपले लक्ष, शक्ती, तग धरण्याची क्षमता सुधारते, रोग प्रतिकारशक्ती निर्माण करते, रोगांचा धोका कमी करते, रक्तदाब कमी करते आणि पचन सुधारते. इतर फायद्यांमध्ये मानसिक आरोग्याचा समावेश होतो, ते एखाद्याला चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आजारांना सामोरे जाण्यास मदत करते कारण ते मन शांत करते आणि तर्कशुद्धपणे विचार करण्यास सक्षम होते. 

            योग आपल्याला शिकवते की आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती तयार करून स्वतःला मदत करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. कोणत्याही वयात सराव करणे कधीही लवकर किंवा उशीर होत नाही. हे केवळ तुम्हालाच लाभ देईल आणि तुमचे जीवन बहुगुणित करेल. योगावरील लांब आणि लहान भाषणांसाठी नमूद केलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा. हे तुम्हाला जे विषय समजावून सांगायचे आहेत ते लक्षात ठेवण्यास आणि तुमचे विचार योग्यरित्या व्यवस्थित करण्यात मदत करेल. 

            पुढील दिलेले योगासन प्रकार केवळ आपल्या माहितीस्तव आहे. कृपया हे प्रकार करताना तज्ञांच्या मार्गदर्शना खाली करावे.      

            चला तर मग आज आपण योगासन  त्याचे प्रकार व फायदे ( Yogasana poses | Yoga asanas | Yoga asanas names | Benefits of Yoga ) ही माहिती पाहूया.

योगासन व त्याचे प्रकार | Yoga Asanas Names

क्रयोगासनेYogasane
हलासनHalasana
पवनमुक्तासनPawanmuktasana
पश्चिमोत्तासनPaschimottasana
सर्वांगासनSarvangasana
चक्रासनChakrasana
नौकासनNaukasana
आकर्णधनुरासनAakrndhanurasan
पादअंगुष्ठ /
नससर्पासन
Padangushtha Asan /
Nasasarpasan
बद्धपद्मासनBadhapdmasan
१०हस्तपादासनHastpadasan
११ताडासनTadasan
१२शीर्षासनShirshasan
१३भुजंगासनBhujangasan
१४बकासनBakasan
१५पर्वतासनParvtasan


योगासन त्याचे प्रकार व फायदे 

[ Yogasanas and their types in Marathi ]


१] हलासन (Halasana):-

हलासनाची कृती :-

१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे. 

२] दोन्ही पाय एकमेकांना जुळवूनच ठेवावेत. 

३] दोन्ही हात कंबरेला चिकटवून सरळ ताठ ठेवावेत.

४] दोन्ही हात उचलून डोक्याच्या वर कानाला लावून सरळ ताठ ठेवावेत. 

५] आता हळूहळू दोन्ही जुळवलेले पाय एकत्रित उचलावे.

६] नंतर डोक्याच्या मागे घेऊन पायाची पावले जमिनीवर टेकवावी.

७] पायांचे अंगठे वर नेलेल्या हाताने धरावेत.

८] हाताने धरलेले अंगठे सोडून हात आता हळूहळू कंबरेलगत खाली आणून जमिनीवर ठेवावेत.

९] हाताचे पंजे जमिनीवर टेकवावे. व पाय जमिनीला टेकलेले असावेत. 

१०] अशा स्थितीत पंधरा ते वीस सेकंद रहावे.

११] आता हळूहळू पाय उचलून खाली आणून जमिनीवर ठेवावेत.

हलासनाचे फायदे (Benefits of Halasana )  :-

१] हलासन उंचीवाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

२] पायाचे व मांडीचे स्नायू मजबूत होतात.

३] पाठीचा कणा ताणला जाऊन तो लवचिक होतो.


हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय


२] पवनमुक्तासन ( Pawanmuktasana ) :-

पवनमुक्तासनाची कृती :-

१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे. 

२] दोन्ही पायांमध्ये अंतर न ठेवता पाय सरळ व ताठ ठेवावेत.

३] डावा पाय सावकाश गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांच्या बोटांनी धरावा.

४] हाताने धरलेल्या गुडघ्याला हनुवटी टेकवावी.

५] हळुवार पाय सरळ खाली करावा.

६] आता उजवा पाय सावकाश गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांच्या बोटांनी धरावा.

७] हाताने धरलेल्या गुडघ्याला हनुवटी टेकवावी.

८] हळुवार पाय सरळ खाली करावा.

९] आता दोन्ही पाय सावकाश गुडघ्यात वाकवून दोन्ही गुडघे हातांच्या बोटांनी धरावे.

१०] हाताने धरलेल्या गुडघ्यांना हनुवटी लावावे.

११] नंतर हळुवार दोन्ही पाय सरळ खाली करावेत.

१२] दोन्ही पाय सरळ ठेवावेत.

पवनमुक्तासनाचे फायदे ( Benefits of Pawanmuktasana )  :-

१] पाठीच्या कण्याला व पायांतील सांधे यांना चांगला व्यायाम होतो.

२] उंची वाढण्यास मदत होते.३] पश्चिमोत्तासन (Paschimottasana):-

पश्चिमोत्तासनाची कृती :-

१] जमिनीवर पुढे पाय पसरून सरळ ताठ, काटकोनात बसावे. 

२] पसरलेले पाय एकमेकांना जुळवून घ्यावेत.

३] दोन हात ताणून कानालगत वर करावेत.

४] आता हळूहळू कंबरेतून वाकत दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडावेत. 

५] परंतू खाली वाकताना श्वास बाहेर सोडावा व पाय गुडघ्यांत अजिबात वाकवू नयेत.

६] हाताचे कोपरे पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर टेकवावेत व डोके गुडघ्याला लावावे.

७] अशा अवस्थेत कमीत कमी दीड मिनिट बसावे.

८] नंतर हळूहळू पायाचे, पकडलेले अंगठे सोडून सरळ ताठ अवस्थेत पूर्वस्थितीत यावे.

पश्चिमोत्तासनाचे फायदे ( Benefits of Paschimottasana )  :-

१] आसनामुळे शरीर लवचिक बनते.

२] पाठीचा कणा, पायाचे व मांडीचे स्नायू बळकट होतात.

३] मणक्यांना चांगला व्यायाम झाल्यामुळे उंची निश्चितच वाढते.

४] पोटाचे स्नायू मजबूत होऊन, पोट कधीही सुट नाही.

५] पाठीचे दुखणे असलेल्यांनी डॉक्टरी सल्ल्यानेच सुरुवात करावी.४] सर्वांगासन (Sarvangasana) :-

सर्वांगासनाची कृती :-

१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे.

२] पाय एकमेकांना जुळवूनच ठेवावे.

३] दोन्ही पाय एकत्रित घेऊन कंबरेजवळ वाकवून पोटाला काटकोन असे ताठ पाय करावेत.

४] आता दोन्ही हात कंबरेखाली घालून हे दोन्ही पाय हळूहळू आणखीन वर उचलून मानेला काटकोनात ताठ करावे.

५] असे करताना हाताने पायाला दिलेला आधार काढू नये.

६] या अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद थांबावे.

७] आता दोन्ही पाय खाली आणून हात काढावेत व नंतर पाय सरळ करावेत.

सर्वांगासनाचे फायदे (Benefits of Sarvangasana ) :-

१] या व्यायामामुळे शरीराला ताण पडून उंची वाढण्यास मदत होते.

२] रक्ताभिसरण वाढते.


हे पण पहा :- अभ्यास करतांना घ्यावयाची काळजी


५] चक्रासन ( Chakrasana ) :-

चक्रासनाची कृती :-

१] जमिनीवर सरळ पाठ ठेवून झोपावे. 

२] पाय सरळ पसरून त्यांच्यामध्ये अंतर ठेवू नये.

३] दोन्ही हात वळवून कानालगत मागे ताठ ठेवावेत,

४] दोन्ही पाय एकत्रित घेऊन गुडघ्यांत वाकवावेत. 

५] पावले जमिनीला लागतील असे पाय ठेवावेत.

६] डोक्याच्या वर घेतलेल्या हाताचे पंजे जमिनीवर टेकवावेत.

७] आता हळूहळू शरीर कंबरेपासून उचलावे. 

८] शरीराचा भार दोन्ही हातांवर व दोन्ही पायांवर उचलावा.

९] हळूहळू सर्व शरीर वर उचलून या सर्व शरीराला अर्धवर्तुळाकार द्यावा.

१०] अशा अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद रहावे.

११] त्यानंतर अगदी सावकाशपणे शरीर खाली आणावे. 

१२] प्रथम कंबरेचा भाग, नंतर पाठीचा कणा असे क्रमाक्रमाने खाली जमिनीला टेकवावे.

१३] त्यानंतर हळूहळू हात व पाय पूर्वस्थितीत आणावेत.

चक्रासनाचे फायदे (Benefits of Chakrasana) :-

१] चक्रासनामुळे पोटाच्या स्नायूंना व पाठीच्या कण्याला भरपूर फायदा होतो.

२] पोटाचे स्नायू मजबूत होतात. 

३] मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. 

४] पाठीच्या कण्याची वाढ होते. 

५] उंची वाढते. ६] नौकासन (Naukasana) :-

नौकासनाची कृती :-

१] प्रथम जमिनीवर पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पायात अंतर ठेवू नये.

२] हनुवटी जमिनीला टेकेल अशा स्थितीत चेहरा ठेवावा. दोन्ही हात मांड्यांना लागून ठेवावे.

३] आता हळूहळू दोन्ही जुळलेले पाय गुडघ्यात वाकवून वर उलट्या दिशेने कंबरेजवळ आणावेत.

४] उजव्या हाताने वाकवलेला उजवा पाय पकडावा व डाव्या हाताने वाकवलेला डावा पाय पकडावा.

५] आता हे पाय दोन्ही हातांनी जोर लावून ओढावेत.

६] डोके जमिनीपासून जितके वर उचलता येईल तेवढे छातीपासून जास्तीत जास्त उचलावे.

७] हाताने ओढलेला पायसुद्धा मांड्यांपासून, कंबरेपासून जेवढे जास्त उचलता येतील तेवढे उचलावेत

८] या स्थितीमुळे शरीराला नौकेप्रमाणे आकार येईल.

९] या स्थितीत कमीत कमी अडीच मिनिटे थांबावे.

१०] त्यानंतर पाय सोडवून हळूहळू पूर्वस्थितीत यावे.

नौकासनाचे फायदे (Benefits of Naukasana) :-

१] शरीर चांगले ताणले जाते व शरीराची उंची वाढते. 

२] पोटातील स्नायू पिळदार होतात.


७] आकर्णधनुरासन (Aakrndhanurasan) :-

आकर्णधनुरासन कृती :- 

१] प्रथम जमिनीवर पाय पुढे पसरून सरळ ताठ बसावे.

२] डाव्या हाताने कंबरेत वाकून उजव्या पायाचा अंगठा धरावा. 

३] त्याप्रमाणेच उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरावा. 

४] असे करताना हात कोपऱ्यात व पाय गुडघ्यात वाकवू नयेत.

५] त्यानंतर आधी डाव्या हाताने धरलेला उजव्या पायाचा अंगठा छातीकडे ओढावा व डाव्या कानाला तो अंगठा लावावा.

६] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तो पाय पूर्वस्थितीत त्याचा धरलेला अंगठा सोडू नये.

७]  उजव्या हाताने कंबरेत वाकून डाव्या पायाचा अंगठा धरावा. 

८] त्याप्रमाणेच डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरावा. 

९] असे करताना हात कोपऱ्यात व पाय गुडघ्यात वाकवू नयेत.

१०] त्यानंतर आधी उजव्या हाताने धरलेला डाव्या पायाचा अंगठा छातीकडे ओढावा व उजव्या कानाला तो अंगठा लावावा.

११] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तो पाय पूर्वस्थितीत त्याचा धरलेला अंगठा सोडू नये. 

१२] तीस सेकंद तसेच थांबून पूर्वपदावर यावे.

१३] अशी क्रिया प्रत्येक पायाने चार-चार वेळा करावी.

आकर्णधनुरासनाचे फायदे (Benefits of Aakrndhanurasan) :-

१] कोपर्याचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

२] पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

३] पायांचे स्नायू ताणून त्यांना बळकट करते.

४] जुनाट बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

५] श्वसन आणि फुफ्फुसाच्या कड्यांना आराम मिळतो.

६] याच्या सरावाने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.

७] याचा नियमित सराव केल्यास शरीरातील लवचिकता वाढते.८] पादअंगुष्ठ / नससर्पासन ( Padangushtha Asan / Nasasarpasan ) :-


पादअंगुष्ठ / नससर्पासन कृती :-

१] प्रथम जमिनीवर दोन्ही पायांवर समान भार देऊन सरळ उभे रहावे.

२] एक पाय पुढे ठेवावा. दुसऱ्या पाय जेवढा मागे घेता येईल तेवढा मागे घ्यावा. 

३] दोन्ही हात मागे घेऊन पाठीवर हातांची घडी घालावी.

४] हळूहळू कंबरेतून वाकत पुढच्या पायाच्या गुडघ्याच्या दिशेने वाकावे.

५] खाली वाकताना दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता खाली वाकून नाकाचा स्पर्श पुढे पाय असलेल्या गुडघ्याला करावा.

६] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तोल सांभाळत पूर्वपदावर येऊन उभे रहावे.

७] यानंतर मागे असलेला पाय पुढे घेऊन वर दिल्याप्रमाणेच कृती करावी.

८] अशी एक आड एक प्रत्येक पायाने कमीत कमी तीन-तीन वेळा कृती करावी.

पादअंगुष्ठ / नससर्पासनाचे फायदे (Benefits of Padangushtha Asan / Nasasarpasan) :-

 १] पायांना व पाठीच्या कण्याला ताण पडून उंची वाढते.९] बद्धपद्मासन (Badhapdmasan) :-

बद्धपद्मासन कृती :-

१] प्रथम जमिनीवर ताठ बसावे.

२] पाय समोर पसरावेत.

३] आता डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.

४] उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.

५] दोन्ही पायांची पावले जास्तीत जास्त कंबरेजवळ ठेवावीत.

६] वरीलप्रमाणे केल्याने पद्मासनाची क्रिया होईल.

७] डावा हात पाठीमागून घ्यावा व त्या हाताने कंबरेजवळ असलेल्या उजव्या पायाचा अंगठा धरावा.

८] या स्थितीतच उजवा हात पाठीमागून घेऊन कंबरेजवळील डाव्या पायाचा अंगठा पकडावा.

९] दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे साठ सेकंद पकडून बसण्याचा प्रयत्न करावा. 

१०] त्यानंतर हळूहळू हात व पाय सोडून, हात सोडून पूर्वस्थितीत यावे.

बद्धपद्मासनाचे  फायदे  (Benefits of Badhapdmasan) :-

१] पाठीच्या मणक्यांना व्यायाम होतो. 

२] पाय ताणले जाऊन पायाचे स्नायू बळकट होतात. 

३] उंची वाढण्यास मदत होते. 

४] हे आसन लठ्ठ मुलांना करायला अवघड जाते; परंतु सवयीने ते सर्वांनाच जमेल. त्यांना याचा फायदा होईल.


१०] हस्तपादासन (Hastpadasan):-

हस्तपादासन कृती :-

१] प्रथम सरळ ताठ उभे रहावे.

२] दोन्ही पाय एकमेकांना जुळवून ठेवावेत.

३] दोन्ही हात कानालागत डोक्याच्या वर खांद्याच्या सरळ रेषेत ताठ करावेत.

४] आता पायाच्या टाचा उचलाव्यात.

५] शरीराला टाचेपासून हातांपर्यंत जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे.

६] आता पाय संपूर्ण जमिनीला टेकवावेत.

७] कंबरेतून वाकून हाताचे तळवे जमिनीला लावावेत.

८] असे करताना गुडघे वाकवू नयेत.

९] हात जमिनीला टेकवल्यानंतर डोके गुडघ्याला लावावे.

१०] या स्थितीमध्ये कमीत कमी पन्नास सेकंद राहण्याचा प्रयास करावा.

११] त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत यावे. 

१२] असे आसन एकाच वेळी तीन ते चार वेळा करावे.

हस्तपादासनाचे फायदे  (Benefits of Hastpadasan) :-

१] गुडघ्यामागून पाय व पाठीचा कणा ताणला जाऊन त्यांचा चांगला व्यायाम होतो.

२] उंची वाढण्यास खूपच मदत होते. 

३] मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. 

४] पोटाचा व्यायाम होतो. ११] ताडासन (Tadasan) :-

ताडासन कृती :-

१] प्रथम दोन्ही पायांवर समान भार देऊन सरळ, ताठ उभे रहावे.

२] दोन्ही हात ताठ कंबरेपर्यंत सरळच ठेवावेत.

३] दोन्ही हात हळूहळू वर करावेत. 

४] हात खांद्याच्या सरळ रेषेत कानालगत अगदी ताठ ठेवावेत.

५] जमिनीपासून टाचा उंच कराव्यात.

६] सर्व शरीराला भरपूर ताण द्यावा.

७] या अवस्थेत दोन ते तीन मिनिटे चालण्याचाही प्रयत्न करावा.

८] तसेच या अवस्थेत थोडे वेळ उभे राहण्याचाही प्रयत्न करावा.

ताडासनाचे फायदे  (Benefits of Tadasan) :-

१] उंची वाढण्याच्या योगासनांतील ताडासन हे अगदी सोपे वा फार महत्त्वाचे आहे.

२] यामध्ये सर्वच शरीर ताणले जात असल्याने उंची वाढते.

३] वाढत्या मुलांना नियमितपणे हे आसन न चुकता करावयास लावावे.
१२] शीर्षासन (Shirshasan):-

शीर्षासन कृती :-

१] प्रथम जमिनीवर एक चादर पसरून त्यावर टॉवेल अंथरावा.

२] आता पातळ मऊसर धोतराप्रमाणे कापड घेऊन त्याची चांगली गुंडाळी करावी.

३] आपले डोके त्यावर राहील एवढ्या आकाराची गुंडाळी करावी.

४] दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून ती डोक्याच्या मागे ठेवावी. 

५] प्रथम खाली बसून हाताचे कोपरे जमिनीला टेकून डोके गुंडाळीवर ठेवावे.

६] त्यानंतर कंबर हळूहळू उचलून पाय छातीकडे उंच करावे. 

७] पाय सावकाशपणे ताठ करावे.

८] दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता एकत्र जुळवून ठेवावे.

९] शरीराचे संपूर्ण वजन हाताचे कोपरे, हातांची बोटे व गुंडाळीवर असलेल्या मस्तकावर पेलावे.

१०] अशा अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद रहावे. 

११] नंतर सवयीनुसार दीड ते दोन मिनिटे रहावे.

१२] हे आसन करताना डोळे बंद ठेवावेत.

१३] शीर्षासन हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हजेरीतच करावे.

१४] पहिल्यांदा या आसनासाठी भिंतीचा आधार घ्यावा.

१५] हे आसन खूपच काळजीपूर्वक करावे. 

शीर्षासनाचे फायदे  (Benefits of Shirshasan) :-

१] नैसर्गिकरीत्या उंची वाढते.

२] यकृताचे आरोग्य चांगले रहाते.

३] बुद्धी व स्मरणशक्ती वाढते.

४] माणूस शतायुषी होतो.

५] दात किडत नाहीत

६] केस गळत नाहीत व काळे राहतात.

७] पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.

८] पचन सुधारते.

९] मेंदूच्या लहान लहान पेशींनासुद्धा चांगला रक्तप्रवाह होतो.

१०] उत्साह व जोम येतो.

११] निरोगी आयुष्य लाभते.

१२] चेहरा तेजस्वी होतो. 

१३ शीर्षासन सर्व आसनांमध्ये श्रेष्ठ असून त्याला आसनांचा राजा म्हणतात. 


१३] भुजंगासन (Bhujangasan):-

भुजंगासन कृती :-

१] प्रथम जमिनीवर पालथे म्हणजेच पोटावर झोपावे.

२] दोन हात कोपऱ्यात वाकवून हातांचे तळवे खांद्याजवळ घ्यावेत.

३] डोके हळूहळू वर करून छताकडे बघावे.

४] याच वेळी कंबरेपासून शरीराचा भाग जेवढा जास्त उचलता येईल तेवढा उचलावा.

५] या अवस्थेत हातांच्या तळव्यांवर जोर द्यावा व हात ताठ करावेत.

६] या अवस्थेत दोन ते तीन मिनिटे थांबण्याचा प्रयत्न करावा.

भुजंगासनाचे फायदे  (Benefits of Bhujangasan) :-

१] मान, पोट, कंबर, पाय ताणले जाऊन त्यांना व्यायाम मिळतो.

२] त्यामुळे उंची वाढते.

३] पोटाचे आरोग्य सुधारते.१४] बकासन (Bakasan) :-

बकासन कृती :-

१] प्रथम जमिनीवर पालथे झोपावे. 

२] नाक जमिनीला टेकवावे.

३] हात कोपऱ्यात दुमडावेत.

४] हातांचे दुमडलेले कोपरे पोटाच्या मध्यभागी आणावेत.

५] हळूहळू संपूर्ण शरीर हातांच्या पंज्यावर भार देऊन जमिनीपासून वर उचलावे.

६] सर्व शरीराचा तोल सांभाळून करावे.

७] या अवस्थेत साठ सेकंद थांबावे.

बकासनाचे फायदे  (Benefits of Bakasan) :-

१] उंची वाढण्यास मदत होते.१५] पर्वतासन (Parvtasan):-

पर्वतासन कृती :-

१] प्रथम पद्मासन घालून ताठ बसावे.

२] दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत कानालगत उंच करावेत. 

३] दोन्ही हात वर एकमेकांना जोडून नमस्काराची मुद्रा करावी.

४] या स्थितीत कमीत कमी दोन मिनिटे राहण्याचा प्रयत्न करावा. 

५] आसन पूर्ण झाल्यावर हळूहळू पूर्वपदावर यावे.

पर्वतासनाचे फायदे  (Benefits of Parvtasan) :-

१] या स्थितीमुळे शरीर कंबरेपासून ताणले गेल्याने उंची निश्चितच वाढते. 


            आम्ही तुम्हाला येथे योगासन म्हणजे काय? योगासनाचे प्रकार कोणते? योगासनाचे फायदे कोणते? योगासनाची कृती ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला योगासना संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला योगासनाचे प्रकार व त्याचे फायदे ( Yoga asanas | Yogasana poses ) ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad