२८ मे दिनविशेष | 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 27, 2024

२८ मे दिनविशेष | 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi

२८ मे दिनविशेष

28 May Dinvishesh

28 May day special in Marathi

२८ मे दिनविशेष | 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi

            २८ मे दिनविशेष ( 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ मे दिनविशेष ( 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ मे दिनविशेष

28 May Dinvishesh

28 May day special in Marathi


@ महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन [International Day of Action for Women’s Health]

[१४९०]=> मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

[१६६०]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म.

[१७८७]=> ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन.

[१८८३]=> क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म.

[१९०३]=> उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म.

[१९०७]=> पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.

[१९०७]=> स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म.

[१९०८]=> दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म.

[१९२१]=> शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म.

[१९२३]=> तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म.


[१९३७]=> नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.

[१९३७]=> फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

[१९४६]=> भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.

[१९५२]=> ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

[१९५८]=> ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

[१९६१]=> प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन.

[१९६४]=> पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.

[१९८२]=> बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.

[१९९४]=> हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.

[१९९८]=> बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.

[१९९९]=> इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

[१९९९]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २८ मे दिनविशेष | 28 May Dinvishesh | 28 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad