पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर | Baseline test schedule announced - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 15, 2025

पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर | Baseline test schedule announced

पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर

Baseline test schedule announced

पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर | Baseline test schedule announced

            पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर ( Baseline test schedule announced) झाले असून ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षा ६ ऑगस्ट रोजी प्रथम भाषा, ७ ऑगस्ट रोजी गणित तर ८ ऑगस्ट रोजी तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच यावर्षी इयत्ता नववीला या  परीक्षेतून वगळण्यात आले आहे. या बाबतचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

            पायाभूत चाचणी दहा माध्यमांतील विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची चाचणी घेतली जाणार असून ही चाचणी मागील इयत्तेचा अभ्यासक्रम व मुलभूत क्षमतांवर आधारित असणार आहे. 

            पायाभूत चाचणी शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. स्थानिक परिस्थितीनुसार काही तारखांमध्ये बदल करायचा झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी एससीईआरटीची पूर्वपरवानगी घेऊन बदल करावा. लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात तोंडी परीक्षा घ्यावी. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. चाचणीसाठीच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून विद्यार्थिनिहाय १४ ते २८ जुलै या कालावधीत पुरवल्या जाणार आहेत.

            तसेच पुढील परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी १ ही ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर पहिला आठवडा या दरम्यान , तर संकलित मूल्यमापन चाचणी २ परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये  घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


          तुम्हाला पायाभूत चाचणी वेळापत्रक जाहीर | Baseline test schedule announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad