भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list

 Chief Election Commissioner of India

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ

Chief Election Commissioner of India List

Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt Yadi

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list

            भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ ( Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi ) समजण्या अगोदर भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission of India ) ची माहिती असणे महत्वाची आहे. भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्विकार केला आहे. त्यामुळे भारतात जनता स्वतः मतदान करून आपला नेता निवडत असते. व त्याला ५ वर्षासाठी देश चालवण्याची संधी देते. यासाठी भारतात भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission of India ) ही भारत सरकारच्या अखत्यारीतील भारतीय संविधानाने कलम ३२४ अन्वये एक स्वायत्त घटनात्मक संस्था तयार करण्यात आली आहे.


            निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभ म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी, न्यायपालिका, आणि प्रेस यानपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार असते. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner ) आणि राष्ट्रपती ( President ) नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त ( Other Election Commissioners ) यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते ). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner ) सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना ( Chief Election Commissioner ) पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. राजीव कुमार हे २५ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.


भारतीय निवडणूक आयोगाची  महत्त्वाची कर्तव्ये :-

  1. मतदारसंघ आखणे.
  2. मतदारयादी तयार करणे.
  3. राजकीय पक्षांना मान्यता देणे.
  4. निवडणूक चिन्हे ठरवणे.
  5. अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणे.
  6. उमेदवारपत्रिका तपासणे.
  7. निवडणुका पार पाडणे.
  8. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे.

            चला तर मग पाहूया आतापर्यंतच्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तची यादी व त्यांचा कार्यकाळ ( Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi )


हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके


भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ

Chief Election Commissioner of India list

Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi

क्रमुख्य निवडणूक
आयुक्ताचे नाव
कार्यकाल
सुकुमार सेन२१/०३/१९५० ते
१९/१२/१९५८
कल्याण सुंदरम२०/१२/१९५८ ते
३०/०९
/१९६७
एस.पी.सेन वर्मा     ०१/१०/१९६७ ते
३०/०९/१९७२
नागेंद्र सिंग         ०१/१०/१९७२ ते
०६/०२/१९७३
टी. स्वामिनाथन    ०७/०२/१९७३ ते
१७/०६/१९७७
एस.एल.शकधर    १८/०६/१९७७ ते
१७/०६/१९८२
आर.के.त्रिवेदी        १८/०६/१९८२ ते
३१/१२/१९८५
आर.व्ही.एस. पेरी शास्त्री      ०१/०१/१९८६ ते
२५/११/१९९०
व्ही.एस. रमादेवी    २६/१२/१९९० ते
११/१२/१९९०
१०टी.एन. शेषन        १२/१२/१९९० ते
११/१२/१९९६
११एम.एस. गिल        १२/१२/१९९६ ते
१३/०६/२००१
१२जे.एम. लिंगडोह      १४/०६/२००१ ते
०७/०२/२००४
१३टी.एस. कृष्णमूर्ती    ०८/०२/२००४ ते
१५/०५/२००५
१४बी.बी. टंडन         १६/०५/२००५ ते
२९/०६/२००६
१५एन. गोपालस्वामी    ३०/०६/२००६ ते
२०/०४/२००९
१६नवीन चावला      २१/०४/२००९ ते
२९/०७/२०१०
१७एस.वाय.कुरैशी      ३०/०७/२०१० ते
१०/०६/२०१२
१८वि.सं. संपत        ११/०६/२०१२ ते
१५/०१/२०१५
१९हरिशंकर ब्रह्मा            १६/०१/२०१५ ते
१८/०४/२०१५
२०डॉ.सय्यद नसीम
अहमद झैदी 
१९/०४/२०१५  ते
०५/०७/२०१७
२१अचल कुमार ज्योती  ०६/०७/२०१७ ते
२२/०१/२०१८
२२ओम प्रकाश रावत   २३/०१/२०१८ ते
०१/१२/२०१८
२३सुनील अरोरा        ०२/१२/२०१८ ते
१२/०४/२०२१
२४सुशील चंद्र       १३/०४/२०२१ ते
१४/०५/२०२२
२५राजीव कुमार        १५/०५/२०२२  ते
पदावर असलेले


हे पण पहा :- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे


भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ( Chief Election Commissioner of India ) विषयी पडलेले काही प्रश्न.

१] भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
=> भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते.

२] सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
=> भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

३] राजीव कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत?
=> राजीव कुमार हे भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

४] भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत?
=> निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल.

५] भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमाने झाली?
=> भारतीय संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती झाली.



          तुम्हाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांचा कार्यकाळ | Chief Election Commissioner of India list | Bhartache Mukhy Nivdnuk Aayukt yadi | List of Chief Election Commissioner of India list ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad