मूलभूत हक्क व कर्तव्ये | Fundamental rights and Basic Duties | Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

मूलभूत हक्क व कर्तव्ये | Fundamental rights and Basic Duties | Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya

FUNDAMENTAL RIGHTS

मूलभूत हक्क व कर्तव्ये

Fundamental Rights and Basic Duties

Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya

मूलभूत हक्क व कर्तव्ये | Fundamental rights and Basic Duties | Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya

          मूलभूत हक्क ( Fundamental rights | Mulbhut Hakka )  व मूलभूत कर्तव्य ( Basic Duties | Mulbhut Kartavya ) (Fundamental rights and Basic duties) ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्क (Fundamental rights) आपल्याला आपले जीवन शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून भारतीय संविधानात दिले आहेत. तर मूलभूत कर्तव्य (Basic duties) हे आपल्याला आपल्या देशाप्रती काय जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव करून देते. आपण आज मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य (Fundamental rights and Basic duties | Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya ) ह्या दोन्ही विषयी थोडक्यात माहिती घेऊया.



मूलभूत हक्क / अधिकार (Fundamental rights | Mulbhut Hakka) :-

          भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्विकार केला आहे. अमेरिकेच्या संविधानातून मुलभूत हक्कांचे (Fundamental rights) तत्व स्वीकारण्यात आलेले आहे तर जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीच्या काळात मुलभूत हक्कांचे (Fundamental rights | Mulbhut Hakka ) निलंबन ह्या या बाबी घेण्यात आलेल्या आहेत. भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून भारतीय संविधानात भाग ३, कलम १२ ते ३५ मध्ये एकूण ७ मुलभूत हक्क देण्यात आल होते. मुलभूत हक्कात (Fundamental rights) १९७८ च्या ४४ व्या घटनादुरुस्तीत संपतीचा हक्क मुलभूत हक्काच्या (Fundamental rights | Mulbhut Hakka) यादीतून वगळन्यात आल्याने संपतीचा हक्क हा आता फक्त कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात येतो त्यामुळे आता त्यांची संख्या फक्त ६ उरली आहे. आता कलम १४ ते ३२ दरम्यानचे ६ मुलभूत हक्क पुढील प्रमाणे आहेत. 


          मुलभूत हक्काचा (Fundamental rights | Mulbhut Hakka) भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते. मूलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मूलभूत हक्कांची (Fundamental rights) व्याख्या केली जाऊ शकते.



भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क ( Fundamental rights | Mulbhut Hakka ) दिलेले आहेत. 

Fundamental rights | Mulbhut Hakka

क्र कलम मुलभूत हक्क Fundamental rights
१४ ते १८समतेचा हक्कRight to Equality
१९ ते २२स्वातंत्र्याचा हक्कRight to Freedom
२३ ते २४शोषणाविरुद्धचा हक्कRight Against Exploitation
२५ ते २८धर्मस्वातंत्र्याचा हक्कRight to Freedom of Religion
२९ ते ३०सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कCultural and Educational Rights
३२घटनात्मक उपाययोजनेचा हक्कRight to Constitutional Remedies


👉१९७८ च्या ४४ व्या घटनादुरुस्तीत संपतीचा हक्क मुलभूत हक्काच्या  (Fundamental rights) यादीतून वगळन्यात आल्याने संपतीचा हक्क हा आता फक्त कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात येतो.

क्रकलममुलभूत हक्कFundamental rights
-संपतीचा हक्कRights to Property



मूलभूत कर्तव्ये  (Basic Duties | Mulbhut kartavye) :-

            भारतीय संविधानात सुरवातीला मुलभूत कर्तव्ये (Basic duties | Mulbhut Kartavya) परंतु काही काळानंतर त्याची गरज भासू लागली जसे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून ज्याप्रमाणे कायदेशीररित्या मुलभूत हक्क (Fundamental rights | Mulbhut Hakka) प्राप्त झाले आहेत, त्याच प्रमाणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने व्यक्तीस काही मुलभूत कर्तव्ये (Basic duties | Mulbhut Kartavya) देखील पार पाडावी लागतात. त्यामुळे १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीत सरदार स्वरणसिंग समितीच्या शिफारसीवरून संविधानात घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A नुसार १० मुलभूत कर्तव्याचा (Basic duties | Mulbhut Kartavya) समावेश करण्यात आला. परंतु २००२ मध्ये ८६ वी घटनादुरुस्ती द्वारे ११ वे शिक्षणविषयक आणखीन एक कर्तव्य टाकण्यात आले. त्यामुळे आता एकूण मुलभूत कर्तव्याची (Basic duties | Mulbhut Kartavya) संख्या ११ आहे.
            ३ जानेवारी हा दिवस 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिन' ( Fundamental Duties of Citizens Day ) म्हणून पाळला जातो. मुलभूत कर्तव्ये (Basic duties | Mulbhut Kartavya) चा भंग केल्यास न्यायालयाच्या शिक्षा होऊ शकते नाही.


भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अकरा मूलभूत कर्तव्ये (Basic duties | Mulbhut Kartavy) दिलेले आहेत.

Basic Duties | Mulbhut Kartavya

क्र मुलभूत कर्तव्ये  (Basic duties)
भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान यांचा आदर करणे.

स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे पालन करणे.
भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे.
देशाचे संरक्षणासाठी गरज पडल्यास देशसेवेस वाहून देणे.
धार्मिक, भाषिक, प्रादेशिक वर्गारहित व भेदरहित भारत निर्माण करणे, स्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, गौरवशाली परंपरेचे रक्षण करणे.
नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन व रक्षण करणे, सजीव प्राणीमात्रांवर दया करणे.
मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानार्जन यांची जोपासना करणे.
सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करणे.
१० राष्ट्राच्या उत्तरोतर प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक उत्कर्ष साधने.
११ ६ ते १४ वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देने हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे.


          तुम्हाला मूलभूत हक्क व कर्तव्ये | Fundamental rights and Basic Duties | Mulbhut Hakka v Mulbhut Kartavya ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad