२९ नोव्हेंबर दिनविशेष | 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 29, 2023

२९ नोव्हेंबर दिनविशेष | 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi

२९ नोव्हेंबर दिनविशेष

29 November Dinvishesh

29 November day special in Marathi

२९ नोव्हेंबर दिनविशेष | 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi

            २९ नोव्हेंबर दिनविशेष ( 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २९ नोव्हेंबर दिनविशेष ( 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२९ नोव्हेंबर दिनविशेष

29 November Dinvishesh

29 November day special in Marathi


[१८०३]=> ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.

[१८४९]=> ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग यांचा जन्म.

[१८६९]=> समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म.

[१८७४]=> नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

[१८७७]=> थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

[१९०७]=> प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.

[१९०८]=> तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

[१९१९]=> इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म.

[१९२०]=> स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म.

[१९२६]=> ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व 
संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

[१९२६]=> लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

[१९३२]=> फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.

[१९३९]=> मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन.

[१९४५]=> युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

[१९५०]=> महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

[१९५९]=> मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन.

[१९६३]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

[१९६३]=> भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

[१९७२]=> अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

[१९७७]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म.

[१९९३]=> जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.

[१९९६]=> नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

[२०००]=> दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

[२०००]=> शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

[२००१]=> बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन.

[२०११]=> आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.



            तुम्हाला २९ नोव्हेंबर दिनविशेष | 29 November Dinvishesh | 29 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad