२४ फेब्रुवारी दिनविशेष | 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 23, 2024

२४ फेब्रुवारी दिनविशेष | 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi

२४ फेब्रुवारी दिनविशेष

24 February Dinvishesh

24 February day special in Marathi

२४ फेब्रुवारी दिनविशेष | 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi

            २४ फेब्रुवारी दिनविशेष ( 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ फेब्रुवारी दिनविशेष ( 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ फेब्रुवारी दिनविशेष

24 February Dinvishesh

24 February day special in Marathi


@ छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती [ Birth anniversary of Chhatrapati Rajaram Maharaj ]

[१६७०]=> राजगड येथे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म.

[१६७४]=> कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

[१८१०]=> हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन.

[१८१५]=> अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन.

[१८२२]=> जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

[१९१८]=> इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९२०]=> नाझी पार्टीची स्थापना झाली.

[१९२४]=> पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म.

[१९३६]=> मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.

[१९३८]=> ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

[१९३८]=> नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.

[१९३९]=> चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म.

[१९४२]=> भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.


[१९४२]=> व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

[१९४८]=> राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म.

[१९५२]=> कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

[१९५५]=> अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म.

[१९६१]=> मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

[१९७५]=> सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन.

[१९८६]=> भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन.

[१९८७]=> इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

[१९९८]=> अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन.

[२००८]=> फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

[२०१०]=> एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

[२०११]=> अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन.            तुम्हाला २४ फेब्रुवारी दिनविशेष | 24 February Dinvishesh | 24 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad