महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 16, 2023

महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi

महात्मा गांधी जयंती भाषण

Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi


महात्मा गांधी जयंती भाषण ( Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi ) हे आपल्याला दरवर्षी २ ऑक्टोबर या त्यांच्या जन्म दिनी प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शासकीय कार्यालये तसेच संपूर्ण भारतभरच नाही तर परदेशात देखील त्याची जयंती साजरी करतात व तेथे भाषणाची आवश्यकता भासते. त्यामुळे तुम्हाला महात्मा गांधी जयंती भाषण ( Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi ) येथे उपलब्ध करून देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi

            सर्वप्रथम मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. आदरणीय मंचस्थ ----------------------- आज आपण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत.


          महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळयावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. 

हे पण पहा :- मराठी बोधकथा

          महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी सद्ध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी पोरबंदरमध्ये दिवाण होते. करमचंद हिंदु मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैश्णव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. 

          महात्मा गांधीजींनी इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास अशी त्यांना चार मुले होती. 


          महात्मा गांधीजींच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन मधून वकीलीचे शिक्षण घेण्यास गेले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले. 


          महात्मा गांधीजीं इ.स. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी इ.स. १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली.. 

हे पण पहा :- विज्ञान दिन

           महात्मा गांधीजी इ.स.१९१५ मध्ये पुन्हा भारतात परत आले. त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे. १९१७ मध्ये चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र करून त्यांनी शेतकऱ्यांना न्यान मिळवून दिला. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. इ.स. १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. 


           ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. 

एक महात्मा होऊनी गेला,
आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती,
बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता ,
सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती
'कोहिनूर' तो हरपुनी गेला....


          महात्मा गांधीजींची जयंती यामुळेच भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

हे पण पहा :- स्वच्छतेची शपथ 

          तुम्हाला महात्मा गांधी जयंती भाषण | Mahatma Gandhi Jayanti speech in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad