क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी | Career in Sports | Career Opportunity in Sports Field - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी | Career in Sports | Career Opportunity in Sports Field

Career in Sports

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी

Career opportunity in sports field

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी ( Career in Sports | Career Opportunity in Sports Field ) आहे की खेळ हा फक्त मनोरंजनाचे साधन आहे. बहुसंख्य लोक त्याकडे फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून बघत असतात परंतु हे अर्ध सत्य आहे कारण आपण त्यातून आपले चांगले करिअर देखील घडवू शकतो याच विषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी | Career in Sports | Career Opportunity in Sports Field

            खेळ हा विषय कुणाचा आवडता नसतो मला तर वाटत सर्वानाच तो आवडत असतो. परंतु खेळात जास्त लक्ष देणा-या मुलांना नेहमी म्हटलं जातं की, अभ्यासात लक्ष द्या. आता मात्र ही मानसिकता बदलायला हवी कारण आपला मुलगा मोबाईलच्या आहारी जाण्यापेक्षा खेळात रमलेला चांगला. खेळाचे फायदे देखील आहेत त्याचे महत्व आपण लहान वयात मुलांना पटवून दिले पाहिजे. शारीरिकदृष्टया मजबूत होण्यासाठी खेळ हा उत्तम पर्याय असल्याचे दि स्पोर्ट्स गुरुकुलचे जय शहा यांनी सांगितले आहे. रोजच्या दैनंदिनीत खेळासाठी किमान एक तास वेळ दिला तर मुलांचे आरोग्य उत्तम राहू शकते. त्यामुळे मुलांच्या मेंदूला ऑक्सिजनचा परिपूर्ण पुरवठा होतो.मुलांचे शरीर सक्रिय राहण्यासाठी त्यांना मैदानी खेळ तसेच मेंदूला चालना देणारे खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मुलांचे वाढते वजन ही एक समस्या सध्या वाढताना दिसते. त्यावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे खेळ. खेळांमुळे मुलांचे वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते.


            खेळात जास्त लक्ष देणा-या मुलांना नेहमी म्हटलं जातं की, अभ्यासात लक्ष द्या. आता मात्र ही मानसिकता बदलताना दिसत आहे. स्पोर्ट्स जगतात आता अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या संधी पाहता येत्या काही वर्षात जवळपास दहा लाख संधी येतील असा अंदाज दि स्पोर्ट्स गुरुकुलच्या जय शहा यांनी व्यक्त केला आहे. भारतात करिअरच्या दृष्टिकोनातून स्पोर्ट्स क्षेत्रात सहसा वाव मिळत नाही किंवा ओळखीच्या आधारे कामं होतात असा न्यूनगंड पाहायला मिळतो. मात्र या क्षेत्रातही ध्येयाने शिक्षण घेतले तर वेगवेगळ्या टप्प्यांत करिअर घडवता येऊ शकते.

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी

Career in Sports | Career Opportunity in Sports Field


अ क्रक्षेत्र
क्रीडा शिक्षक | Sports teacher
क्रीडा सहाय्यक | Sports Assistant
फिटनेस एक्सपर्ट | Fitness Expert
क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ | Sports Psychiatrist
क्रीडा व्यवस्थापन | Sports Management
क्रीडा विपणन | Sports Marketing
क्रीडा पत्रकार | Sports journalist

क्रीडा समालोचक | A sports commentator
स्पोर्ट्स मीडिया मॅनेजर / पीआर | Sports Media Manager / PR

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी ( Career in Sports | Career Opportunity in Sports Field ) :- 

१] क्रीडा शिक्षक ( Sports teacher )

            आजकाल लहान वयातच मुलांची योग्य आवड लक्षात घेऊन त्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. लहानपणीच एखाद्या खेळाचे संस्कार मुलांवर झाले तर ते या क्षेत्रात नक्कीच पुढे जाऊ शकतात. यात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे शाळांमधील क्रीडा शिक्षकांचा. क्रीडा शिक्षक हे केवळ खेळांबाबत मार्गदर्शनच करत नाही तर एखाद्या खेळाबाबत आवड निर्माण करतात आणि त्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देतात.


२] क्रीडा सहाय्यक ( Sports Assistant )

            कोणत्याही खेळाडूला आयकॉन बनवणे किंवा त्याची ब्रँिडग करणे सध्या ट्रेंड आहे. तेव्हा एखाद्या खेळाडूचा पर्सनल असिस्टंट किंवा त्यांच्याशी मिळताजुळत्या कंपन्यांसाठी काम करणे हाही करिअर म्हणून चांगला पर्याय आहे.


३] फिटनेस एक्सपर्ट ( Fitness Expert )

            सर्वच खेळाडूना शारीरिकदृष्टया निरोगी आणि सुदृढ असणे गरजेचे असते. यासाठी ते हेल्थ क्लब किंवा पर्सनल ट्रेनरचा पर्याय निवडतात. हीच संधी असते फिटनेस एक्सपर्ट किंवा ट्रेनर म्हणून करिअर घडवायची. यासाठी विविध कोस्रेसही घेतले जातात. ज्यामध्ये खेळाडूंसाठीच्या फिटनेस प्रशिक्षणाचे शिक्षण दिले जाते. यातूनच आपल्याला करियरची संधी उपलब्ध होते.


४] क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ ( Sports Psychiatrist )

            प्रत्येक खेळाडू जसा शारीरिकदृष्टया निरोगी असणे गरजेचे असते, तसाच तो मानसिकदृष्टयाही निरोगी असावा लागतो. खेळ म्हटलं की, यश अपयश हे सुरूच असते. मात्र मानसिकदृष्टया न खचता आपला खेळ कसा चांगला होईल, यासाठी तसेच खेळासाठी बुद्धीचा वापर करताना कशाप्रकारे समतोल साधला पाहिजे यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. तेव्हा क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ हा एक उत्तम करियरचा पर्याय तुम्हाला असू शकतो.


५] क्रीडा व्यवस्थापन ( Sports Management )

            तुम्हाला खेळासोबत मनोरंजन विश्वात रस आहे तर क्रीडा व्यवस्थापन हा उत्तम पर्याय आहे. सध्या असे बरे इव्हेंट्स होतात, ज्यात रिपोìटग मॅनेजरची भूमिका महत्त्वाची असते. क्रीडा व्यवस्थापनमध्ये जाहिरात, ऑडिअन्स, सुरक्षा व्यवस्था यामध्ये अनेक पर्याय आहेत.


६] क्रीडा विपणन ( Sports Marketing )

            आजकाल कोणतीही गोष्ट मार्केटिंग शिवाय विकली जात नाही त्याला क्रीडा क्षेत्र ही अपवाद नाही ब-याच मॅचेस, इंटरनॅशनल चॅम्पियनशिप किंवा लीग्स होत असतात. याचं मार्केटिंग आणि त्याचं बाजारपेठेशी असलेलं नातं यासाठी मार्केटिंग क्षेत्रातील ज्ञान असलेल्यांची गरज असते.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

७] क्रीडा पत्रकार ( Sports journalist )

            क्रीडा क्षेत्रात सध्या मीडियामध्येही अनेक मार्ग खुले होत आहेत. ज्या तरुणांना खेळविश्वात अधिक रस आहे, ज्यांचे लेखनही उत्तम आहे त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश मीडियात संधी उपलब्ध आहेत. समालोचक, स्पोर्ट्स लेखक तसेच स्पोर्ट्स रिपोर्टर अशी विविध पदे मीडियात आहेत. खेळ विश्वात दररोज होणा-या अपडेटविषयी माहिती देणाऱ्यांची गरज मीडियाला आहे. तेव्हा ज्यांना खेळाचे आणि त्याबाबतच्या संवादाचे उत्तम ज्ञान आहे, असे तरुण यात चांगले करिअर घडवू शकतात.


८] क्रीडा समालोचक ( A sports commentator )

            समालोचन हे असे करिअर आहे, ज्यामुळे करिअरच नाही तर वैयक्तिक पातळीवरही तुम्ही नावारूपाला येऊ शकतात. हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रवी शास्त्री असे अनेक दिग्गज ज्यांनी खेळाडू म्हणून नाव कमावले आहे व आता समालोचक म्हणून काम करतात. यासाठी अर्थात कोणत्याही खेळाचं सखोल ज्ञान आवश्यक आहे.


९] स्पोर्ट्स मीडिया मॅनेजर / पीआर ( Sports Media Manager / PR )

            स्पोर्ट्स मीडिया मॅनेजर ही एक अशी व्यक्ती असते जी या क्षेत्रातील सर्व आवश्यक माहिती मीडियापर्यंत पोहोचवते. यासाठी अनेक मॅनेजमेंट कोस्रेस उपलब्ध आहेत. शिवाय पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन मॅनेजर हा या संबंधीचं काम करतो. स्पोर्ट्स क्षेत्रात याव्यतिरिक्त इक्विपमेंट स्पेशलिस्ट, स्टेडियम मॅनेजमेंट एक्सपर्ट, अ‍ॅकॅडमी मॅनेजर, लाईफगार्डस तसेच कॅम्प मॅनेजर अशादेखील ब-याच संधी उपलब्ध असतात. खेळ विश्वातलं सखोल आणि त्यातील अपडेट्स याचं गाठोडं सोबत असेल तर या क्षेत्रात तरुणांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दि स्पोर्ट्स गुरुकुल या संस्थेतर्फेही अनेक ट्रेनर्स मुंबईतील विविध शाळांमध्ये पुरवले जातात.

हे पण पहा :- MPSC

            तुम्हाला क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी | Career in Sports | Career Opportunity in Sports Field ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad