दिवाळी भाषण मराठी | Diwali bhashan in marathi | Diwali speech in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Sunday, October 26, 2025

दिवाळी भाषण मराठी | Diwali bhashan in marathi | Diwali speech in Marathi

दिवाळी भाषण मराठी

Diwali bhashan in Marathi

Diwali speech in Marathi

दिवाळी भाषण मराठी | Diwali bhashan in marathi | Diwali speech in Marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला...
आनंदाचा सण आला...
एकच मागणे दिवाळी सणाला...
सौख्य, समृद्धी, लाभो सर्वाना...

            भारत देशाला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. कारण येथील रूढी, परंपरा व मोठ्या प्रमाणावर सण-उत्सव साजरे केले जातात. तसेच प्रत्येक ऋतू, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक देवतेशी संबंधित असे अनेक सण साजरे केले जातात. भारतात साजऱ्या होणाऱ्या सर्व सणान मधील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. दिवाळी सणाला सणांची राणी म्हटले जाते. तसेच तिला ‘प्रकाशाचा सण’ किवा दिव्यांचा सण देखील म्हटले जाते. कारण या दिवशी अमावास्या असते व सर्वत्र अंधार असतो त्या अंधाराचा नाश करून प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. 

            दिवाळी सण पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे इंग्रजी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्या दरम्यान येत असतो. या सणाला भारतात सर्वाना सुटी असते. या सणाला हिंदूचा पवित्र सण मनाला जातो जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. या मागे काही धार्मिक व ऐतिहासिक कारणे आहेत. असे म्हटले जाते की, प्रभू श्रीरामांनी सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याचा वध केला तसेच १४ वर्षे वनवासाची पितृआज्ञा संपवून अयोध्येला परतले त्या दिवशी अयोध्यावासीयांनी दिवे लावून आनंद साजरा केला तो हाच दिवस. त्यामुळे त्या दिवसापासून हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. तर काही ठिकाणी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा आहे. 

            दिवाळी सणाला प्राचीन काळी यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात.

दिवाळी हा सण मुख्यतः सहा दिवसांचा असतो. व त्या प्रत्येक दिवसाला वेगळे महत्व असतात. 
  १] पहिला दिवस - वसुबारस
  २] दुसरा दिवस - धनत्रयोदशी
  ३] तिसरा दिवस - नरक चतुर्दशी
  ४] चौथा दिवस - लक्ष्मीपूजन
  ५] पाचवा दिवस - बलिप्रतिपदा किंवा पाडवा
  ६] सहावा दिवस - भाऊबीज

१] वसुबारस :-

दिवाळीचा प्रारंभ वसुबारस या दिवसाने होतो. या दिवशी गाई-वासरांचे पूजन केले जाते. गाईचे आपल्या जीवनात फार मोठे स्थान आहे. दूध, दही, तूप या रूपाने ती आपल्याला पोषण देते. म्हणूनच तिला "गायत्री माता" मानले जाते. या दिवशी गाईला भरजरी वस्त्र, फुले घालून तिची आरती केली जाते. हा दिवस आपल्याला पशुधनाबद्दल कृतज्ञ राहण्याची जाणीव करून देतो.

२] धनत्रयोदशी (धनतेरस) :-

या दिवशी समुद्रमंथनातून प्रकटलेले धन्वंतरि देव यांची पूजा केली जाते. ते आयुर्वेदाचे जनक मानले जातात. म्हणून या दिवशी आरोग्याची प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी सोने-चांदी, नवी भांडी, वस्त्र खरेदी करण्याची प्रथा आहे. हा दिवस आपल्याला निरोगी राहण्याचे आणि संपत्तीचा योग्य उपयोग करण्याचे महत्व सांगतो.

३] नरक चतुर्दशी :-

या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना भयातून मुक्त केले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे या दिवसाला "नरक चतुर्दशी" असे म्हणतात. लोक सकाळी उटण्याने स्नान करतात, सुगंधी तेलाने अंगाला लेप लावतात. या दिवशी शरीरशुद्धी आणि मनशुद्धी यावर भर दिला जातो.

४] लक्ष्मीपूजन :- 

दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. व्यापारी वर्ग आपली खाती या दिवशी बंद करून नवीन वर्षाची सुरुवात करतो. श्रीमहालक्ष्मी, भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा करून धन-धान्य, समृद्धी आणि सुखसमाधान यांची प्रार्थना केली जाते. घर स्वच्छ व सुंदर सजवले जाते. हा दिवस आपल्याला श्रमाने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करण्याची प्रेरणा देतो.

५] बलिप्रतिपदा (पाडवा) :-

या दिवशी राजा बलिचे स्मरण केले जाते. भगवान विष्णूने वामन अवतार घेतला आणि बलिचे राज्य पाताळात नेले, अशी कथा सांगितली जाते. परंतु बलिराजाच्या प्रजेमधील प्रेमामुळे वर्षातून एकदा त्याला भेट देण्याची संधी दिली गेली. या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस भावंडांच्या नात्याचे महत्व अधोरेखित करतो.

६] भाऊबीज :-

दिवाळीचा शेवट भाऊबीज या दिवशी होतो. बहीण भावाला तिलक लावून त्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या दिवशी भावंडांतील प्रेम, जिव्हाळा आणि जबाबदारीची भावना दृढ होते.

दिवाळीचे प्रत्येक दिवस आपल्याला वेगवेगळा संदेश देतात – पशुधनाचे महत्व, आरोग्याची जपणूक, शरीरशुद्धी, संपत्तीचे संरक्षण, नातेसंबंधांची जपणूक आणि समाजात ऐक्य टिकवणे. दिवाळी म्हणजे केवळ फटाके, मिठाई किंवा सजावट नव्हे; तर तो एकात्मता, प्रेम, समृद्धी आणि आनंदाचा उत्सव आहे. म्हणूनच दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय होय.

धनाची पूजा, यशाची प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पडावा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या
सर्वाना सोनेरी शुभेच्छा !!!

          तुम्हाला दिवाळी भाषण | Diwali bhashan in Marathi / Diwali speech in Marathi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad